कोलंबो । येथे आज भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना होत आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत श्रीलंका संघाने केवळ दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आहे.
भारताने या मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना सोडून भारतीय संघाने सर्व सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतला होता तर चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
गेल्या सामन्यातील सलामीवीर शिखर धवनच्या जागी मुंबईकर अजिंक्य रहाणे या सामन्यात खेळणार आहे. शिखर धवन कौटुंबिक कारणांमुळे हा वनडे सामना आणि एकमेव टी२० सामना खेळणार नाही.
श्रीलंका संघाची धुरा पुन्हा एकदा वनडे कर्णधार उपुल थरांगा थरंगा सांभाळणार आहे. षटकांची गती न राखल्यामुळे त्याला दोन सामन्यात बंदी घालण्यात आली होती. चौथ्या सामन्यात लंकेच नेतृत्व अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने केले होते.
आजच्या सामन्यात ३ मुंबईकर खेळाडू खेळत आहेत. त्यात सलामीवीर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर हे खेळाडू आहेत. तसेच महाराष्ट्रीयन रणजीपटू केदार जाधवने संघात कमबॅक केले आहे.
श्रीलंका संघ: निरोशन डिकवेळला (यष्टीरक्षक फलंदाज), दिलशान मुनावीरा, उपुल थरांगा(कर्णधार), अँजेलो मॅथेवस, लाहिरू थिरिमाने, मिलिंदा सिरीवर्धाना, अकिला धनंजया,मलिंदा पुष्पाकुमारा, विश्वा फर्नांडो, लसिथ मलिंगा.वाणिदु हंसरंगा
भारतीय संघ: अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केदार जाधव, मनीष पांडे, एमएस धोनी (यष्टीरक्षक फलंदाज), युझवेन्द्र चहल,भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह