बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमधील सहमालकी असणाऱ्या त्रिबंगो नाइट रायडर्स संघाने काल या लीगमध्ये अंतिम सामना जिंकून शाहरुखच्या नावे खास विक्रम केला.
शाहरुख खानची मालकी असलेल्या संघाने आजपर्यंत तब्बल ४ ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यात २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये विजेतेपद जिंकले आहे तर कालच्या विजयाबरोबर त्रिबंगो नाइट रायडर्सनेही कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये दोनदा अर्थात २०१५ आणि २०१७ साली विजेतेपद जिंकले आहे.
या संघांचा सहमालक असल्याकारणाने शाहरुखसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असणार आहे. विशेष म्हणजे तीन खंडात तीन वेगवेगळ्या ट्वेंटी-ट्वेंटी लीगमध्ये संघ असणारा शाहरुख हा पहिला व्यक्ती आहे.
शाहरुख खानने टी२० ग्लोबल लीगमधील केप टाउन संघ विकत घेतला. यापूर्वी आयपीएल मधील कोलकाता नाइट रायडर्स संघाची तसेच कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाइट रायडर्स संघाची सहसंघमालकी शाहरुख खानकडे होती.
https://twitter.com/iamsrk/status/905997454285275137