चेन्नई | आज प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा दुसरा दिवस. यात पहिला सामना पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स तर दुसरा सामना तमिल थलाईवाज विरुद्ध युपी योद्धाज असे सामने आहेत.
तमिल थलाईवाजचा स्टार आॅलराऊंडर मनजीत चिल्लरला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. प्रो कबड्डी इतिहासात केवळ टॅकलमधून २५० गुण घेणारा पहिला खेळाडू होण्याची त्याला आज मोठी संधी आहे.
पाटना पायरेट्स विरुद्ध त्याने कालच्या सामन्यात ५ गुण टॅकल मधून मिळवले. त्यामुळे आता त्याचे ७५ सामन्यात २४८ गुण झाले आहेत. तसेच प्रो कबड्डीत सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो ४६० गुणांसह ८व्या स्थानावर आहे.
मनजीतने या हंगामाची जबरदस्त सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून या सामन्यातही मोठी अपेक्षा आहे. भारतीय संघाचा कर्णधार अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली मनजीत सध्या तमिल थलाईवाज संघाकडून खेळत आहे.
प्रो-कबड्डीत टॅकलमधून सर्वाधिक गुण घेणारे खेळाडू
२५०- मनजीत चिल्लर, सामने- ७५
२१८- सुरेंदर नाडा, सामने- २१८
२१५- संदीप नरवाल, सामने- ८४
२०९- मोहित चिल्लर, सामने- ७७
२०४- रविंद्र पहेल, सामने- ६७
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रो कबड्डी: गिरीष एर्नाक की सुरेंदर नाडा? आज पुणे विरुद्ध हरियाणात कबड्डीचा थरार
–टॉप 5: प्रो कबड्डीच्या पहिल्याच दिवशी झाले हे खास विक्रम