पुण्याच्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दुसऱ्या दिवशी सारिश देसाई (6-36, 6-75) याने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर स्टार क्रिकेट अकादमी संघाने पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी विरुद्ध पहिल्या डावात 115 धावांची आघाडी मिळवली आणि या आघाडीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील दोन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाच्या 29 षटकात 8बाद 133धावापासून खेळ पुढे सुरु झाला. तत्पूर्वी काल प्रथम फलंदाजी करताना स्टार क्रिकेट अकादमी संघाने पहिल्या डावात 58 षटकात सर्वबाद 248धावा केल्या. याच्या उत्तरात स्टार क्रिकेट अकादमीकडून फिरकीपटू सरिश देसाईने 6-36 याने भेदक गोलंदाजी करत पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाचा डाव 29.3 षटकात सर्वबाद 133धावात गुंडाळून फॉलोन लादला.
दुसऱ्या डावात पीबीकेजेसीए संघाला 45.5 षटकात सर्वबाद 263धावा करता आल्या. यात अभिमन्यू जाधवने 101 चेंडूत 15चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 92धावा, यश भांबोळीने 63चेंडूत 7 चौकाराच्या 50धावा, प्रतीक बोधगिरेने 24धावा, निलय नेवास्करने 23धावा केल्या. स्टार क्रिकेट अकादमीकडून सारिश देसाईने 75धावात 6 गडी, तर ऋषभ गुप्ताने 49धावात 3 गडी करून केले. विजयासाठी स्टार क्रिकेट अकादमीला १४८ धावांचे लक्ष्य होते. पण स्टार क्रिकेट अकादमी संघाला आज दिवस अखेर 41 षटकात 7 बाद 116धावा करता आल्या. यात सोहम लेलेने सर्वाधिक 42धावा, निशांत नगरकरने 27धावा, शुभंकर हर्डीकरने 12 धावा केल्या. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे स्टार क्रिकेट अकादमी संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: स्टार क्रिकेट अकादमीः 58 षटकात सर्वबाद 248 धावा वि.पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी: 29.3 षटकात सर्वबाद 133धावा (ऋतुराज वीरकर नाबाद 56 (37,9×4,2×6), कौस्तुभ पाटील 18, ओंकार खाटपे 13, सारिश देसाई 6-36, रेहान खान 2-25); स्टार क्रिकेट अकादमी संघाकडे पहिल्या डावात 115 धावांची आघाडी;
दुसरा डाव: पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी: 45.5 षटकात सर्वबाद 263धावा (अभिमन्यू जाधव 92(101,15×4,1×6), यश भांबोळी 50 (63,7×4), प्रतीक बोधगिरे 24, निलय नेवास्कर 23, यश खळद 02, सारिश देसाई 6-75, ऋषभ गुप्ता 3-49) वि.स्टार क्रिकेट अकादमी: 41 षटकात 7 बाद 116धावा (सोहम लेले 42(85,6×4), निशांत नगरकर 27, शुभंकर हर्डीकर 12, रिषभ गुप्ता नाबाद 1, सारिश देसाई नाबाद 4, निलय नेवस्कर 4-37, यश खळदकर 2- 52); सामना अनिर्णित; स्टार क्रिकेट अकादमी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत न्यूझीलंडने भारताला टाकले मागे, पाकिस्तानचेही नुकसान
ईडन गार्डन, 33 चौकार-9 षटकार; 8 वर्षापूर्वी झालेल्या भारत-श्रीलंका सामन्याने बदलला होता वनडेचा इतिहास