---Advertisement---

फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मेस्सी वाटतोय गोल्ड आयफोन, जाणून घ्याच

On: शुक्रवार, मार्च 3, 2023 3:23 PM
Lionel-Messi-35-Gold-Iphone
---Advertisement---

मागील वर्षी कतार येथे फीफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी याने संघाला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. अशात मेस्सीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या संघसहकारी आणि सपोर्ट स्टाफला अनोखी भेटवस्तू देऊन हा क्षण अजरामर करण्याचा निर्णय घेतला आहे. मेस्सीने सोन्याच्या 35 आयफोनची ऑर्डर दिली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, हे 35 सोन्याचे आयफोन मेस्सीने शनिवारी (दि. 25 फेब्रुवारी) त्याच्या पॅरिसच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचवले होते.

किती आहे किंमत?
लिओनल मेस्सी (Lionel Messi) या विजयानंतर इतका आनंदी झाला की, त्याने संघाच्या विजयात सामील व्यक्तींना ही खास भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला. माध्यमांतील वृत्तांनुसार, 35 सोन्याच्या आयफोनची (35 Gold Iphones) किंमत 1,75,000 पाऊंड म्हणजेच जवळपास 1.73 कोटी रुपये इतकी आहे. वृत्तामध्ये असेही म्हटले गेले आहे की, “लिओनल मेस्सीला त्याच्या सर्वात गौरवास्पद क्षणाचा जल्लोष करण्यासाठी काही करायचे होते, परंतु त्याला घड्याळासारखी सामान्य भेट द्यायची नव्हती. त्यासाठी त्याने उद्योजक बेन लियोनसोबत मिळून ही कल्पना सुचवली.”

आयफोनवर काय लिहिलंय?
माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रत्येक आयफोनवर प्रत्येक खेळाडूचे नाव आमि अर्जेंटिना संघाचा लोगो लावण्यात आला आहे. आयफोनच्या मागे प्रत्येक खेळाडूच्या नावासोबतच त्याच्या जर्सीचा नंबरही आहे. सर्व आयफोनवर विश्वविजेतेही लिहिले आहे. हे सर्व आयफोन आयडिझाईन कंपनीने डिझाईन केले आहेत. आयडिझाईनच्या सीईओने मेस्सीची प्रशंसा करत म्हटले की, “तो आमचा खूप चांगला  गिऱ्हाईक आहे. मेस्सीने विश्वचषकानंतर काही महिन्यातच आमच्याशी संपर्क साधला होता.”

खरं तर, मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने मागील वर्षी विश्वचषक जिंकला होता. या विजयाने मेस्सीला खूपच भावूक केले होते. कारण, यासाठी त्यांनी दोन दशकापेक्षाही जास्त काळ वाट पाहिली होती. 20 वर्षांमध्ये एखाद्या युरोपीय नसणाऱ्या संघाने विश्वचषक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. मागील वर्षी कतारमध्ये विश्वचषक विजय अर्जेंटिनासाठी एक ऐतिहासिक क्षण होता. यामध्ये मेस्सीला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते. (star football player lionel messi buys 35 gold iphones for his world cup winning team check price)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेस्सीचा जीव धोक्यात! कुटुंबाच्या सुपरमार्केटवर हल्लेखोरांकडून गोळीबार, स्टार फुटबॉलपटूला धमकी
ब्रेकिंग! विश्वचषकात विक्रमी खेळी करणारा दिग्गज फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड, क्रीडाविश्वावर शोककळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---