---Advertisement---

IPL Mega Auction; धाकटा भाऊ विकला गेला, पण सरफराज खान ठरला अनसोल्ड!

On: सोमवार, नोव्हेंबर 25, 2024 9:26 PM
Sarfraz-khan
---Advertisement---

आयपीएल (IPL 2025)च्या मेगा लिलावात (Mega Auction) अतिशय मनोरंजक बोली पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंसाठी विक्रमी बोली लावण्यात आली. पण अनेक खेळाडू विकले गेले नाहीत. या लिलावात भारतीय कसोटी क्रिकेटपटू सरफराज खान (Sarfaraz Khan) मेगा लिलावादरम्यान न विकला गेला. मात्र, त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान (Musheer Khan) लिलावात विकला गेला. मुशीर खानचा पंजाब किंग्जने (Punjab Kings) त्यांच्या संघात समावेश केला.

सरफराज खानला (Sarfaraz Khan) खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. याशिवाय त्याचा भाऊ मुशीरला पंजाबने लिलावादरम्यान विकत घेतले. मुशीरची मूळ किंमत 30 लाख होती आणि पंजाबने त्याला त्याच्या मूळ किमतीवर खरेदी केले.

सरफराज खानच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने आतापर्यंत 40 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 441 धावा केल्या. दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 138.24 राहिला आहे. आता त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. मुशीर खानने दुलीप ट्रॉफी दरम्यान 181 धावांची शानदार खेळी खेळून ठळक बातम्या निर्माण केल्या आणि तेव्हापासून आयपीएल 2025च्या मेगा लिलावादरम्यान त्याला खरेदी केले जाऊ शकते अशी चर्चा सुरू होती. आता त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL Mega Auction; मूळ किंंमतीत देखील विकले गेले नाहीत, ‘हे’ स्टार खेळाडू
आरसीबीसाठी झंझावाती शतक झळकावणाऱ्या स्टार खेळाडूचा मुंबई संघात समावेश
IPL Mega Auction; मुंबईसाठी मैदान गाजवणारा खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---