भारतात पुढच्या ५ वर्ष होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाने तब्बल ६१३८.१ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. या इ- लिलावात आज स्टारने सोनी आणि जिओ या दोन दिग्गज कंपन्यांना मागे टाकत हे हक्क मिळवले.
हे हक्क २०१८-२०२३ या ५ वर्षांसाठी असून २०१२-२०१८ या ५ वर्षांसाठी मिळालेल्या रकमेच्या तब्बल ५१.३९% हा रक्कम जास्त आहे.
हे हक्क १५ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२३ या काळासाठी आहेत.
Congratulations @StarSportsIndia on bagging the BCCI Media Rights @ 6138.1 crores at an average of 60.1 crore per game.
— Anirudh Chaudhry (@AnirudhChaudhry) April 5, 2018
या लिलावात तीन दिग्गज कंपन्यांनी भाग घेतला होता. गेले ३ दिवस कुणीही माघार घेतली नाही. त्यामूळे हा पहिल्या दिवशी ४ हजार कोटींवर गेलेला ई-लिलाव काल संध्याकाळी ६ हजार कोटींवर गेला आहे.
पहिल्या दिवशी ४४४२ कोटींवर संध्याकाळी ६ वाजता हा लिलाव बंद झाला होता तो काल ६०३२.५० कोटींवर बंद झाला.
यात स्टार इंडिया, जिओ आणि सोनी या आघाडीच्या कंपन्यांनी भाग घेतला होता.
२०१२ रोजी स्टार टीव्हीने ३८५१ कोटींची बोली लावत प्रसरणाचे हक्क २०१२ ते २०१७ साठी मिळवले होते.
भारतात होणाऱ्या १०२ सामन्यांसाठी ही लिलाव प्रक्रिया सुरु होती. यात जागतिक टीव्ही प्रसारण अधिकार, भारतातील प्रसारणाचे अधिकार, अशिया खंडातील प्रसारणाचे अधिकार तसेच डिझीटल अधिकारांचाही समावेश आहे.