नुकताच टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेला इंग्लंडच्या रूपात विजेता मिळाला. ही स्पर्धा संपल्यानंतर आता इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयपीएलचा छोटा लिलाव (मिनी ऑक्शन) 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी, आयपीएलच्या रिटेन्शन व ट्रेडिंगबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत.
आयपीएल 2023 साठी कायम राखलेल्या खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी देण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत पहिल्या ट्रेडिंग विंडोमध्ये 4 ट्रेड झाले आहेत. या संपूर्ण घडामोडींदरम्यानच आयपीएलच्या आगामी हंगामातून ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार व कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा माघार घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्यासोबतच दुसरा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा देखील यंदाही आयपीएल लिलावात आपले नाव देणार नाही. हे दोन्ही दिग्गज वेगवान गोलंदाज यावर्षी होणाऱ्या ऍशेस मालिकेच्या तयारीसाठी वेळ देतील.
कमिन्स हा मागील तीन वर्षांपासून केकेआर संघाचा भाग आहे. तर, स्टार्क 2018 च्या आयपीएल लिलावानंतर आयपीएलमध्ये दिसला नाही. त्याने अखेरच्या वेळी आयपीएलमध्ये 2015 साली आपले कौशल्य दाखवलेले.
कमिन्स पुढील आयपीएल हंगामात खेळणार नसल्याने केकेआरला जबर धक्का बसला आहे. त्याच्या आधी इंग्लंडच्या सॅम बिलिंग्सनेही कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. केकेआरने या आयपीएल हंगामासाठी आपली तयारी सुरू केली असून, तीन खेळाडूंना ट्रेडिंग विंडोमध्ये आपल्या ताफ्यात सामील करून घेतलेय. त्यांनी गुजरात टायटन्सकडून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन व अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज यांना ट्रेड केले. तर, दिल्ली कॅपिटल्सकडून भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूर याला आपल्या संघात सामील करून घेतले.
( Starc And Cummins Not Participate In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनच्या पदार्पणाच्या वयात ‘या’ केली 407 धावांची खेळी, 50 षटकांच्या सामन्यात घडला इतिहास
आयपीएल 2023पूर्वी गुजरातच्या गोटातून मोठी बातमी, ‘या’ स्टार खेळाडूला केले रिटेन