भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ मधील दुसरा सामना (बॉक्सिंग डे कसोटी) २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाईल. पहिल्या सामन्यात भारताला अक्षरश: नामोहरम केलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा आत्मविश्वास या सामन्यात कमालीचा वाढलेला असेल. दुसरी कसोटी आपल्या नावे करून मालिकेत भक्कम आघाडी घेण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरेल. त्यामुळे, ऑस्ट्रेलियन संघ सरावात कोणत्याही प्रकारचे ढिलाई दाखवत नाहीये. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क हा नेटमध्ये आपल्याच सहकाऱ्यांना जेरीस आणत आहे.
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने मिळवला मोठा विजय
यजमान ऑस्ट्रेलियाने ऍडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत भारताला ८ गड्यांनी पराभव करत मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटीत पॅट कमिन्स व जोस हेजलवुड यांनी भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावत गुंडाळला. ही भारताची आतापर्यंतची सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात तितकेसे योगदान न दिलेला प्रमुख वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुसऱ्या कसोटीसाठी पूर्णपणे सज्ज असलेला दिसतोय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत त्याने घातक गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवले.
स्मिथ-लॅब्युशेनला केले पस्त
ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी आणि प्रमुख फलंदाज असलेला स्टीव स्मिथ याला गोलंदाजी करताना स्टार्कने अतिशय वेगाने चेंडू फेकत गोंधळून टाकले. स्मिथ मोठ्या मुश्किलीने या चेंडूपासून वाचताना दिसला.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा मुख्य फलंदाज मानला जात असलेला युवा मार्नस लॅब्युशेन हा देखील स्टार्कच्या गोलंदाजीवर गोंधळला. स्टार्कने फेकलेल्या बाउन्सरचे उत्तर लॅब्युशेनकडे नव्हते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे दोन्ही व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत.
Mitch Starc v Steve Smith 🔥 #AUSvIND pic.twitter.com/qROySN13g8
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2020
Marnus Labuschagne cops a bouncer from Mitch Starc – and he is PUMPED! 🔊#AUSvIND pic.twitter.com/ys49jnUp4f
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2020
पहिल्या कसोटीची स्टार्कने केली होती दमदार सुरूवात
ऍडलेड येथील पहिल्या कसोटीत स्टार्कने अवघ्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉचा त्रिफळा उडवत मालिकेची सनसनाटी सुरुवात केली होती. पहिल्या डावात स्टार्कच्या नावे ४ बळी होते. मात्र, दुसर्या डावात कमिन्स व हेजलवुड यांनी भारताचा संपूर्ण संघ भारत केल्याने स्टार्कला एकही बळी मिळाला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
अरे बापरे! दहा वर्षात ‘या’ गोलंदाजाने टाकले तब्बल २७,३०८ आंतरराष्ट्रीय चेंडू
ऑस्ट्रेलिया सावधान! भारतीय संघ करु शकतो पलटवार, दिग्गजाचा इशारा
“विराट असा खेळाडू, ज्याच्याबद्दल एका शब्दात व्यक्त होणे अशक्य”
ट्रेंडिंग लेख –
व्हिडिओ : त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली सर्वात भारी भेट
…अन् पियुष चावलाने घेतलेल्या त्या विकेटचा एका वर्षात सचिनने घेतला बदला
गुडबाय २०२०: या’ पाच क्रीडासुंदरींनी घेतली यावर्षी निवृत्ती; एक होती जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू