पुणे : विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजाराम विष्णू आगरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १५ वी एकदिवसीय राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक २६ जानेवारी रोजी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा भांडारकर रोडवरील साने डेअरी चौक येथील मिलेनियम टॉवर्स या ठिकाणी होणार आहे.
ही स्पर्धा खुल्या तसेच १४ आणि १० वर्षांखालील अशा तीन गटांत होणार आहे. स्वीस लीग पद्धतीने होणारी ही स्पर्धा एकूण सात फेऱ्यांमध्ये होईल. आतापर्यंत १६० हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत गौरव बाकलिवाल, अलौकिक सिन्हा, कविश लिमये, विकास शर्मा, आर्यन राव, प्रसाद उगावकर, आर्यन सिंगला, राघव पावडे, शौर्य घेलानी, पारस शर्मा, युवान कदम, राम लतिक, परम जलान, शार्वी बाकलिवाल, युग बार्डिया आदी प्रमुख खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेला चीफ आर्बिटर म्हणून राजेंद्र शिदोरे हे काम पाहणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५० हजार रुपयांची रोख पारितोषिके; तसेच करंडक, पदके व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे, यंदाच्या या स्पर्धेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती क्रीडा समिती अध्यक्ष अभिजीत मोडक आणि मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटर ऑफ द इयर बनल्यानंतर गिल इमोशनल, विराटचं नाव घेत म्हणाला…
ICC Awards । वर्ल्डकप गाजवणाऱ्या रचिनला मिळाला मोबदला, भारतीय सलामीवीराला मागे टाकत जिंकला आयसीसीचा सन्मान