नाशिक, 9 ऑगस्ट। पुनित बालन गृप यांच्या सहयोगाने आणि महाराष्ट्र ज्यूदो संघटनेतर्फे आयोजित 49वी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सलग अकराव्यांदा विकास देसाई याने सुवर्ण पटकावून अव्वल स्थान अबाधित ठेवले तर गौतमी कांचन, समीक्षा शेलार, अपूर्वा पाटील या सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूनी आपल्या प्रतिस्पर्ध्याना सहज नमवत विजय संपादन केला. विभागीय क्रीडा संकुल येथील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये पुनित बालन गृप यांच्या सहयोगाने आणि नाशिक जिल्हा ज्यूदो संघटनेच्या सहकार्याने आयोजित स्पर्धा उद्यापर्यंत चालतील.
90 किलोखालील गटात अंतिम लढतीत पुण्याच्या विकास देसाईने उस्मानाबादच्या मनोज जाधवला 48 सेकंदात दे-आशी-हराई या डावाचा वापर करून इप्पोन या पूर्ण गुणाने पराजित केले. मुंबईच्या संपदा फालके हिने ठाण्याच्या प्रांजल पुराणिकचा ताई-ओतोषी डाव मारून दोन वाझाआरी गुण घेऊन पराभव केला. पुण्याच्या गौतमी कांचंनने कोल्हापूरच्या रुधवी शृंगारपूर हिला सिओई नागे या डावाने तर क्रीडा प्रबोधिनीच्या समीक्षा शेलारने ग्राऊंड टेक्निकमधील केसागातामे होल्डचा वापर करून नाशिकच्या तनुजा वाघला हरविले. ठाण्याच्या अपूर्वा पाटील या खेळाडूने ओ-गोशी या डावाचा अत्यंत सफाईदार वापर करत अवघ्या 40 सेकंदात मुंबईच्या शांभवी कदमला पराभूत केले. नागपूरचा नवोदित साईप्रसाद काळे याने अत्यंत बहारदार खेळी करून दोनदा आक्रमण केले आणि प्रत्येकवेळी वाझा-आरी गुण घेऊन यवतमाळच्या अभिषेक दुधेला पराभवाची धूळ चाखाली.
दरम्यान सकाळच्या सत्राच्या प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले यावेळी यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात यावर्षी संघटनेच्या अंतरराष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेतील यशवंत खेळाडूंचा आणि अंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिल्पा सेरिगर आणि स्मिता शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळाडुंमध्ये थायलंड आशियाई स्पर्धेतील कांस्य पदक विजेती श्रद्धा चोपडे, मकाऊ आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती रोहिणी मोहिते यासह आशियाई स्पर्धेत सातवी आलेली समीक्षा शेलार, अजिंक्य वैद्य, आदित्य धोपावकर, शुभांगी राऊत, प्रदीप गायकवाड, अपूर्वा पाटील, शायना देशपांडे,स्ंनेकल खावरे, गौतमी कांचन आदींचा समावेश होता. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक, उपाध्यक्ष आणि नाशिक ज्यूदो संघटनेचे सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन, सहसचिव डॉ. गणेश शेटकर, कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर, तांत्रिक समितीचे अध्यक्ष रवी पाटील, सचिव दत्ता आफळे, डॉ. सतीश पहाडे, सौ अर्चना पहाडे, जयेंद्र साखरे या पदाधिकार्यांबरोबरच नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक विजय पाटील आणि स्पर्धा संचालक शैलेश देशपांडे यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश वाघचौरे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल-
पुरुष गट- 90 किलोखालील – सुवर्ण- विकास देसाई, पुणे; रौप्य- मनोज जाधव उस्मानाबाद;
कांस्य- मौला अली शेख, मुंबई; कांस्य-स्वप्नील मांधारे, ठाणे
पुरुष गट-73 किलोखालील – सुवर्ण- साईप्रसाद काले, नागपूर; रौप्य- अभिषेक दुधे, यवतमाळ;
कांस्य- राहुल बोम्बाडी, मुंबई; कांस्य- आदर्श शेट्टी, ठाणे;
महिला – 63 किलोखाली- सुवर्ण- गौतमी कांचन, पुणे; रौप्य- रुधवी शृंगारपूर, कोल्हापूर;
कांस्य- भूमी कोरडे, मुंबई; कांस्य- तन्वी पवार, सिधुदुर्ग
महिला -70 किलोखाली- सुवर्ण-समीक्षा शेलार, क्रीडा प्रबोधिनी; रौप्य- तनुजा वाघ, नाशिक;
कांस्य- प्रेक्षा बोरकर, ठाणे; कांस्य- आरती टकले, पुणे;
महिला -78 किलोखालील- सुवर्ण- संपदा फाळके, मुंबई; रौप्य- प्रांजल पुराणिक, ठाणे;
कांस्य- दिव्य कोरडे, नाशिक; कांस्य- सुमेधा पठारे, औरंगाबाद
महिला -78 किलोवर- सुवर्ण- अपूर्वा पाटील, ठाणे; रौप्य- शांभवी कदम, मुंबई;
कांस्य-नियती गुल्हाणे, अमरावती; कांस्य-सारिका गायकवाड, कोल्हापूर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शमी टी-२० विश्वचषकाचा भाग नक्की असेल’, भारताच्या माजी यष्टीरक्षकाचे भाकित
एशिया कपच्या बाहेर भारताच्या ‘या’ सलामीवीराची टी२० लीगमध्ये विस्फोटक खेळी
रूडी कर्स्टनप्रमाणेच ‘या’ पाच क्रिकेटपटूंचाही झालेला कार अपघातामुळे शेवट