महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेअशन व देवगड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित पुरुष व महिला (निमंत्रित संघ) राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाचा १७ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
“माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे स्मृतीचषक” या नावाने जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे तालुका देवगड यांनी यास्पर्धेचा आयोजन केल आहे. काल पासून (१७ जानेवारी) यास्पर्धेला प्रारंभ झाला. महिलांच्या अंकुर स्पोर्ट्स मुंबई विरुद्ध संजीवनी मुंबई उपनगर यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात अंकुर स्पोर्ट्स मुंबई ने ४३-१० अशी विजयी सलामी दिली. तर महिलांच्या दुसऱ्या सामन्यात कुर्लाई पालघर विरुद्ध अनिकेत स्पोर्ट्स रत्नागिरी यांच्यात अनिकेत स्पोर्ट्स ने ५०-२९ असा विजय मिळवला.
पुरुष गटात उत्कर्ष क्रीडा मंडळ विरुद्ध सिंधुपुत्र कोलोशी यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात उत्कर्ष क्रीडा मंडळ उपनगर ने ३२-१७ असा सामना जिंकत विजयी सलामी दिली. छावा कोल्हापूर विरुद्ध दोस्ती रत्नागिरी यांच्यातील सामना छावा रत्नागिरी संघाने ४४-३१ असा जिंकला.
ओम कबड्डी संघ कल्याण विरुद्ध दोस्ती रत्नागिरी संघात चुरशीची लढत झाली. रत्नागिरी मध्यंतरापर्यत २३-१६ अशी आघाडीवर होती. ओम कल्याण संघाने आपला खेळ उंचावत आक्रमक खेळ केला. सुयोग व अनिकेत ने चढाईत गुण मिळवत ओम कबड्डी कल्याण संघाला ३६-३३ असा विजय मिळवून दिला..
पहिल्या दिवसाचे संक्षिप्त निकाल:
महिला विभाग
१) अंकुर स्पोर्ट्स मुंबई ४३ विरुद्ध संजीवनी उपनगर १०
२) कुर्लाई पालघर २९ विरुद्ध अनिकेत रत्नागिरी ५०
३) देवरुख रत्नागिरी ०९ विरुद्ध जयहनुमान बाचणी कोल्हापूर २८
४) सत्यम उपनगर ४० विरुद्ध हॉलीक्रॉस सिंधुदुर्ग ३८
५) स्वराज्य उपनगर ३९ विरुद्ध देवरूख स्पोर्ट्स २०
पुरुष विभाग
१) ओम कबड्डी कल्याण ३६ विरुद्ध दोस्ती रत्नागिरी ३३
२) विजय बजरंग मुंबई २३ विरुद्ध सिंधूपुत्र १५
३) अंबिका ३७ विरुद्ध सिंधुदुर्ग बॉयस २०
४) छावा कोल्हापूर ४४ विरुद्ध दोस्ती रत्नागिरी ३१
५) उत्कर्ष उपनगर ३२ विरुद्ध सिंधुदुर्ग कोलोशी ३१
६) अंबिका उपनगर १६ विरुद्ध अंकुर मुंबई शहर २०
७) नव महाराष्ट्र उपनगर १६ विरुद्ध जयभारत मुंबई शहर ४४
८)अंकुर मुंबई शहर ४४ विरुद्ध सिंधुदुर्ग बॉयस ३२
९) नवभारत कोल्हापूर ३३ विरुद्ध नव महाराष्ट्र उपनगर २५