---Advertisement---

बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा.

On: बुधवार, एप्रिल 10, 2019 8:49 PM
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बंड्या मारुती सेवा मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचं मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.

माजी अध्यक्ष कै. बबनराव दारवटकर चषक व राष्ट्रीय खेळाडू कै. परशुराम मांडेकर चषक राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे ११ ते १४ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण केंद्र, ललित कला भवन, ना म जोशी मार्ग डीलाईल रोड, मुंबई येथे यास्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. सामने ठीक सायंकाळी ५ वाजता सुरू होतील.

मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे असे ३ जिल्ह्यातील यास्पर्धेत २१ पुरुष संघ सहभागी होणार असून त्याचं ७ गटात विभाजन करून पहिले दोन दिवस साखळी सामने खेळवण्यात येतील. तिसऱ्या दिवशी उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्वचे सामने खेळवण्यात येतील. अंतिम दिवशी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने होतील.

ही स्पर्धा २ मातीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. विजयी, उपविजयी, उपांत्य उपविजयी संघास रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक दिवसाचा उत्कृष्ट खेळाडु, स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू, पकडपटू व सर्वात्कृष्ट खेळाडुस गौरविण्यात येणार आहे.

सर्व संघांना सूचित करण्यात येत आहे की उद्या स्पर्धेचा पहिला दिवस असून स्पर्धेची सुरुवात ठिक सायंकाळी ५ वाजता होईल. आचारसंहितेमुळे ही वेळ ठरविण्या आली असून याची सर्व संघांनी, संघ व्यवस्थापक व खेळाडूंनी याची दखल घेऊन ठिक ४ वाजेपर्यंत उपस्थिती नोंदवावी व आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे असे बंड्या मारुती सेवा मंडळ यांच्या प्रतिनिधीनी सांगितलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment