पुणे । महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आणि राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय पाचव्या सब-ज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेत 36 किलो वजनी गटात सातारा जिल्ह्याचा रोहित चोरसिया, 38 किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याचा उमर शेख, 40 किलो वजनी गटात पुणे शहराचा रोहित पवार, 42 किलो वजनी गटात साताऱ्याचा पार्थ ढोणे, 44 किलो वजनी गटात धुळ्याचा नयन सोनावने, 46 किलो वजनी गटात साताऱ्याचा कुणाल माने, 48 किलो वजनी गटात मुंबई उपनगरच्या लकी श्रीवास्तव याने विजयी पंच लागवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तसेच सर्वाधिक 40 गुण मिळवत सातारा जिल्हा मुष्टीयुद्ध संघाला काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या पाचव्या सब-ज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत 36 किलो वजनी गटात साताऱ्याचा रोहित चौरसिया याला सुवर्ण तर पुणे जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेचा वेदांत बेगले याला रौप्य, 38 किलो वजनी गटात पुणे जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेचा उमर शेख याला सुवर्ण तर साताऱ्याचा आदित्य जाधव याला रौप्य, 40 किलो वजनी गटात पुणे शहराचा रोहित पवार याला सुवर्ण, तर अकोला शहराचा सुमीत खरात याला रौप्य, 42 किलो वजनी गटात साताऱ्याचा पार्थ ढोणे याला सुवर्ण तर आकालो शहराचा प्रतिक्ष भालेराव याला रौप्य, 44 किलो वजनी गटात धुळ्याचा नयन सोनावने या सुवर्ण तर नगर जिल्ह्याच्या शुभम कारले याला रौप्य, 46 किलो वजनी गटात साताऱ्याचा कुणाल माने याला सुवर्ण तर पुणे शहराचा सनी कापसे याला रौप्य, 48 किलो वजनी गटात मुंबई उपनगरच्या लकी श्रीवास्तव याला सुवर्ण तर मुंबईच्या क्रीडा प्रबोधिनीचा शाश्वत तिवारी याला रौप्य, 50 किलो वजनी गटात ठाणे जिल्ह्याच्या राहूल सिंग याला सुवर्ण तर मुंबई उपनगरच्या विकी कामत याला रौप्य, 52 किलो वजनी गटात मुंबईच्या क्रीडा प्रबोधिनीच्या ओमकार चौगुले याला सुवर्ण तर पुणे शहराचा चैतन्य पेंडनेकर याला रौप्य, 54 किलो वजनी गटात साताऱ्याच्या आयुष मोकाशी याला सुवर्ण तर क्रीडा प्रबोधिनीच्या सुयश चौगुले याला रौप्य, 57 किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याचा कुणाल घोरपडे याला सुवर्ण तर सातारा शहराचा ओमकुमार फरांडे याला रौप्य, 60 किलो वजनी गटात पुणे शहराचा चैतन्य कोलेकर याला सुवर्ण तर मुंबई उपनगरचा किरण पवार याला रौप्य, 63 किलो वजनी गटात पुणे जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेचा अन्वर मुजावर याला सुवर्ण तर नगरच्या तेजस पारखे याला रौप्य आणि 66 किलो वजनी गटात सातारा जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेचा अभिवर्धन शर्मा याला सुवर्ण तर औरंगाबादच्या रनवीर भोसले याला रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.
सातारा संघ सर्वात्कृष्ट
पाचव्या सब-ज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेत सर्वात्कृष्ट खेळ करत 40 गुणांसह सातारा जिल्हा मुष्टीयुद्ध संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले. पुणे जिल्हा आणि पुणे शहर मुष्टीयुद्ध संघाला अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक मिळाले. सर्वात्कृष्ट मुष्टीयुद्धा म्हणून साताऱ्याचा कुणाला माने याला गौरविण्यात आले.








