काल श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटीमध्ये झालेल्या पहिल्या दिवसातील काही विक्रमांनंतर आजही भारतीय खेळाडूंनी ती कामगिरी सुरु ठेवली. आज दुसऱ्या दिवशीही असंख्य विक्रम या कसोटीमध्ये झाले. विशेषतः भारतीय फलदांजांनी यात जास्त विक्रम केले. त्यातील काही ठळक विक्रम..
१. भारताच्या प्रत्येक विकेटसाठीची भागीदारी ही २० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची होती. असे करणारा भारत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज नंतर केवळ तिसरा संघ बनला आहे.
२. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २८ कसोटी सामन्यात भारतीय संघाने ६ वेळा एका डावात ६०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. हा एक विश्वविक्रम आहे. बाकी कोणत्याही कर्णधाराच्या नेतृत्वाखाली ५ पेक्षा अधिक वेळा संघाला ६०० धावांहून अधिक धावसंख्या उभारता आलेल्या नाहीत.
५- एस गांगुली (४९) / एमएस धोनी (६०) / अ बॉर्डर (९३) / जी स्मिथ (१०९)
३. अश्विनने आज गोलंदाजी करताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५००वे निर्धाव षटक टाकले. मागील सामन्यात जडेजाने ४००वे निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता.
४. सलामीला येऊन दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करताना अश्विनने ६१ बळी घेतले आहेत. त्याच्या मागे याच सामन्यात खेळत असलेला श्रीलंकेचा रंगाना हेराथ ६० विकेट्सवर आहे.
५. मागील ७ महिन्यात भारताने सहा वेळा एका डावात ६०० हुन अधिक धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघ असून त्यांनी अशी कामगिरी फक्त एकवेळा केली आहे.
६. ६२२/९ ही भारताची श्रीलंकेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
७. या वर्षात ४ वेळा ६००पेक्षा अधिक धावसंख्या भारताने केल्या आहेत. २००७ नंतर हे पहिल्यांदा घडले आहे.
८.या मालिकेत १० भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत अर्धशतके लगावली आहेत.
९. हरभजन आणि कोहली नंतर अश्विन तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे ज्याने स्वतःच्या २००० कसोटी धावा षटकार मारून पूर्ण केल्या.
१०. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये ८० वेळा ५०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इंग्लंडने १०५ वेळा तर ऑस्ट्रेलियाने १४१ वेळा असा विक्रम केला आहे.
११. अश्विनने २००० धावा आणि २५० विकेटस सर्वात कमी म्हणजे ५१ सामन्यात घेतल्या आहेत. हा विश्वविक्रम आहे.
१२. श्रीलंकेच्या ३ फिरकी गोलंदाजांनी १०० हुन अधिक धावा दिल्या आहेत. असे होण्याची ही तिसरीच वेळ आहे.
१३. गेल्या पाच डावात चौथ्यांदा हेराथने १०० धावा दिल्या आहेत. त्या अगोदरच्या ४१ डाव्यांमध्ये त्याने १०० पेक्षा अधिक धावा फक्त एकदाच दिल्या होत्या.