दिल्ली । भारतीय संघाने काल इतिहासात प्रथमच न्यूजीलँड संघावर टी२०मध्ये विजय मिळवला. या सामन्यात अनेक विक्रम झाले ते असे
– भारतीय संघाची १५८ ही टी२० मधील सर्वोच्च सलामीची भागीदारी. जुना विक्रम गंभीर आणि सेहवाग जोडीने २००७ मध्ये इंग्लंड विरुद्ध केला होता.
-दोन्ही सलामीवीरांनी सारख्याच धावा करताना केलेल्या सर्वोच्च धावा ८०.
-घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना भारताने ३ बाद २०२ हा सर्वोच्च स्कोर केला आहे.
-नेहराच्या शेवटच्या कसोटी, वनडे आणि टी२० सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे.
-भारताकडून टी२० मध्ये भाग घेतलेला नेहरा (३८वर्ष आणि १८६ दिवस) हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. सर्वात जास्त काळ राहुल द्रविड (३८वर्ष आणि २३२ दिवस) टी२० खेळला.
-८० हा शिखर धवनचा टी२० मधील सर्वोच्च स्कोर आहे.
-भारतीय संघाने काल ७व्यांदा २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा टी२० सामन्यात केल्या. दक्षिण आफ्रिका (११) आणि ऑस्ट्रेलिया (९) यांनी केवळ यापेक्षा भारतापेक्षा जास्त वेळा हा विक्रम केला आहे.
-भारताकडून सर्वाधिक टी२० अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा (१२) दुसरा. विराट कोहली (१७) अव्वल तर युवराज सिंग(८) तिसरा.
-ट्वेंटी२० आणि टी२० मिळून सर्वाधिक षटकार मारण्याचा भारतीय विक्रम आता रोहित शर्माचा नावावर. रोहित शर्मा (२६६), रैना(२६५) आणि युवराज (२४४). ख्रिस गेलने ७७२ षटकार खेचत अव्वल स्थान मिळवले आहे.