डब्लिन | शुक्रवार, २९ जून रोजी होत असलेल्या भारत विरुद्ध आयर्लंड टी२० सामन्यात विजय मिळवत भारत २ सामन्यांची टी२० मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
भारताने पहिला टी२० सामना ७६ धावांनी जिंकला आहे. पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम होण्याची अपेक्षा होती. परंतु शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीविरांनी बाकी फलंदाजांना आणि गोलंदाजांना विक्रम करण्याची संधी दिली नाही.
परंतु आजच्या सामन्यात यातील काही विक्रम नक्की होतील. ते असे-
३०० षटकार-
सुरेश रैनाला टी२०मध्ये ३०० षटकार पुर्ण करण्याची संधी आहे. त्याने सर्व प्रकारच्या टी२० सामन्यांत मिळुन २९५ षटकार खेचले आहे.
रैना आजपर्यंत २९२ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७८३३ धावा करताना ७०२ चौकार आणि २९५ षटकार खेचले आहे.
टी२० मध्ये आजपर्यंत केवळ ७ खेळाडूंनी ३०० षटकार मारले आहेत. त्यात रोहित शर्मा हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. रोहितने २८५ सामन्यात ३०७ षटकार खेचले आहे.
या यादीत अव्वल स्थानी ख्रिस गेल असून त्याने ३३५ सामन्यात ८४६ षटकार मारले आहेत. जगात अन्य कोणत्याही खेळाडूला ५२८ पेक्षा जास्त षटाकार टी२० सामन्यांत मारता आलेले नाही.
५० षटकार-
धोनीने ९० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ४६ षटकार मारले आहेत. या सामन्यात जर धोनीने ३ षटकार मारले तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ५० षटकार मारणारा तो जगातील २४वा खेळाडू ठरणार आहे.
भारताकडून यापुर्वी रोहित शर्मा (८३), सुरेश रैना(५४) आणि युवराज सिंग (७४) यांनी ५० षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ५६ सामन्यात १०३ षटकार मारले आहेत. त्याबरोबर ७५ सामन्यात १०३ षटकार ठोकत न्युझीलंडचा मार्टीन गप्टीलही अव्वल स्थानावर विराजमान आहे.
२००० धावा
विराट कोहली या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत २००० धावा करण्याची मोठी संधी आहे. सध्या त्याच्या नावावर ५८ सामन्यात १९८३ धावा. त्याने आज १३ धावा केल्या तर टी२०मध्ये २००० धावा करणारा तो तिसरा फलंदाज होणार आहे.
१००० धावा
भारताकडून परदेशात टी२० सामन्यात १००० धावा करणारा चौथा खेळाडू होण्यासाठी धोनीला १४६ धावांची गरज. यापुर्वी असा पराक्रम रोहित शर्मा (१३५८), विराट कोहली (१२७९) आणि सुरेश रैना (१०९१) यांनी केला आहे.
४५ धावा
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १५०० धावा करण्यासाठी एमएस धोनीला ४५ धावांची गरज. धोनीने ९० सामन्यात १४५५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट, मोठा खेळाडू करतोय पुनरागमन
-कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!