मुंबई । भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक जागतिक विक्रम रचले आहेत. 1990 च्या दशकात एकापेक्षा एक खतरनाक गोलंदाजी आक्रमणाचा सामना त्याने केला. पण त्याच्या कारकिर्दीत २ वेळा स्टीव बकनर या पंचांनी त्याला चूकीच्या पद्धतीने बाद दिल्याने अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली होती.
खरंतर स्टीव बकनर यांच्याकडे पंच म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव होता. बकनर यांनी 1992, 1996, 1999, 2003 आणि 2007 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून काम पाहण्याचा हा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकरला चुकीच्या पद्धतीने बाद देणाऱ्या स्टीव्ह बकनर यांनी नुकताच बार्बाडोस मधल्या एका कार्यक्रमात खुलासा केला आहे. निवृत्तीनंतर तब्बल अकरा वर्षांनंतर स्टीव बकनर यांनी सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याची आपली चूक मान्य केली आहे.
ते म्हणाले, “मी सचिनला दोन वेळा बाद देऊन दोनदा चुकी केली. मला वाटत नाही की, कोणताही पंच मुद्दाम चूक करतो. चुकीचा निर्णय दिल्याने अनेक खेळाडूंचे भवितव्य खराब होते.”
ते म्हणाले, “चूक माणूसच करत असतो. एकदा मी 2003 साली ऑस्टेलियात खेळत असताना सचिनला पायचीत म्हणून घोषित केले. वास्तविक पाहता, तो चेंडू स्टम्पच्या खूपच वर जात होता. त्यानंतर भारतात ईडन गार्डनमध्ये सामना होता. या मैदानावर नेहमीच गर्दी असते आणि जेव्हा भारत फलंदाजी करत असतो तेव्हा बऱ्याच वेळा बॅटचा आवाजही येत नाही.”
‘माझ्याकडून झालेल्या या चुकीवर मी नाराज आहे. चूक मान्य करणे हे देखील आपल्या आयुष्यातला एक भाग आहे,’ असेही ते म्हणाले.
सचिनकडे प्रत्येक प्रकारचा फटका आहे. तो खरोखरच महान फलंदाज आहे पण सचिन तेंडुलकरपेक्षा ब्रायन लारा हा सर्वोत्तम खेळाडू असल्याचे त्यांनी नमूद केले.
बकनर यांनी 128 कसोटी सामन्यात आणि 181 वनडे सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहेत.
त्यांनी 2003 ला ब्रिस्बेन येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील कसोटी सामन्यादरम्यान जेसन गिलेस्पीच्या चेंडूवर सचिनला चूकीचे बाद दिले होते. त्यानंतर 2005 साली पाकिस्तान विरुद्धच्या एका सामन्यात सचिनला चूकीच्या पद्धतीने झेलबाद दिले होते. अब्दुल रजाकने टाकलेला चेंडू बॅटच्या बाजूने त्याची दिशा बदलत यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. त्यावेळी बकनर यांना चेंडूने बॅटला स्पर्श केला असल्याचे वाटल्याने त्यांनी त्याला बाद दिले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
युवराज सिंगचा खुलासा, कित्येक वर्ष मला लागली नाही शांत झोप, पण…
सचिनला कर्णधार बनवणाऱ्या ‘या’दिग्गज खेळाडूंची आज ८१ वी जयंती
डिविलियर्स, डूप्लेसिस, रबाडा सारख्या दिग्गजांचा समावेश असलेली ही अनोखी स्पर्धा स्थगित