इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेनंतर निवृत्त होऊ शकतो, असा दावा त्याच्या एक माजी सहकारी गोलंदाजाने केला आहे. 2009 मध्ये आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या स्टीव्ह हार्मिसनचा मते ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ येथे होणारी पाचवी कसोटी अँडरसनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो.
कसोटी क्रिकेटमध्ये 226 बळी घेणाऱ्या स्टीव्ह हर्मिसनच्या मनात आलेला हा विचार कदाचित काही विनोदाने प्रेरित झाला असेल, पण तो त्यामागील अचूक तर्कही देतो. अँडरसनच्या निवृत्तीचा दावा करताना त्याने अशी कारणेही दिली आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे.
सहा फूट चार इंच उंच असलेल्या 43 वर्षीय वेगवान गोलंदाजाने सांगितले की, “ऍशेस मालिका पुढे ढकलली जाईल किंवा पूर्णपणे रद्द केली जाईल. कारण इंग्लंडच्या काही वरिष्ठ खेळाडूंनी धमकी दिली आहे की, जर ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या कुटुंबाला सोबत आणण्याची परवानगी दिली नाही. तर ते या दौऱ्यावर जाण्यास नकार देतील. अशा परिस्थितीत 39 वर्षीय जेम्स अँडरसन, जो जबरदस्त गोलंदाजी करत आहे, त्याच्या घरच्या मैदानावर ही शानदार कारकीर्द संपवण्याचा विचार करू शकतो.”
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तीन कसोटीनंतर पाच सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पुढील दोन कसोटी द ओव्हल आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळले जाणार आहेत. चौथी कसोटी 2 सप्टेंबरपासून होणार आहे.
दुसरीकडे, चौथ्या कसोटीत प्रेक्षकांना भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अँडरसन यांची जुगलबंदी पाहण्यास भेटण्यास शक्यता खूप कमी आहे. कारण यजमान संघ पुढील सामन्यासाठी अँडरसनला विश्रांती देऊ शकतात. तीन आठवड्यांच्या कालावधीत तीन कसोटी सामने असल्याने दोन्ही संघांना आपाआपले गोलंदाज बदली करणे भाग पडले आहे. भारतीय संघाने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे, तर इंग्लंडही याच मार्गाचा अवलंब करू शकतो. अँडरसनने मात्र हे स्पष्ट केले की, त्याला कसोटी मालिकेतील प्रत्येक सामना खेळायचा आहे. पण खेळाचा ताण बघता इंग्लड व्यवस्थापन अँडरसनला विश्रांती देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
विरोधी संघाच्या दिग्गजाचा भारताला मदतीचा हात, फलंदाजी बळकट करण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला
स्कॉटलंडची टी२०त प्रशंसनीय कामगिरी, फ्रान्सला अवघ्या २४ धावांवर गुंडाळत ७ विकेट्सने जिंकला सामना
ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग ११






