ऍडलेड। कालपासून(29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान(Australia vs Pakistan) संघात दुसरा कसोटी सामना ऍडलेड ओव्हल(Adelaide Oval) स्टेडियमवर सुरु झाला आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव आज (30 नोव्हेंबर) 3 बाद 589 धावांवर घोषित केला आहे.
या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने(Steve Smith) आज 64 चेंडूत 36 धावा केल्या आहेत. त्याला पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने बाद केले. पण स्मिथ जरी लवकर बाद झाला असला तरी त्याने आज खास विश्वविक्रम केला आहे.
स्मिथने कसोटीमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा त्याने केवळ 126 व्या कसोटी डावात खेळत असताना पार केला आहे. त्यामुळे तो कसोटीमध्ये सर्वात जलद 7000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.
त्याने हा पराक्रम करताना इंग्लंडच्या वॉल्टर हेमन्ड(Walter Hammond) यांना मागे टाकले आहे. हेमन्ड यांनी 131 कसोटी डावात 7000 धावांचा टप्पा पार केला होता.
स्मिथचे आता कसोटीमध्ये 126 डावात 63.16 सरासरीन 7013 धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या 26 शतकांचा आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याचबरोबर स्मिथ हा कसोटीमध्ये 7000 धावांचा टप्पा पार करणारा ऑस्ट्रेलियाचा एकूण 11 वा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आज ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन(Don Bradman) यांच्या कसोटीमधील 6996 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
#कसोटीमध्ये सर्वात जलद 7000 धावा करणारे क्रिकेटपटू –
126 डाव – स्टिव्ह स्मिथ
131 डाव – वॉल्टर हेमन्ड
134 डाव – विरेंद्र सेहवाग
136 डाव – सचिन तेंडूलकर
138 डाव – गॅरी सोबर्स / कुमार संगकारा / विराट कोहली
या गोष्टीसाठी गौतम गंभीरने दिली विराट कोहलीला साथ; म्हणाला…
वाचा- 👉https://t.co/9TKF4mW2oO👈#म #मराठी #TeamIndia #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain— Maha Sports (@Maha_Sports) November 30, 2019
एमएसके प्रसाद म्हणतात, हा खेळाडू चौथ्या क्रमांकासाठी परफेक्ट https://t.co/bO3bjxrJNf#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #TeamIndia
— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019