ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज स्टिव्ह स्मिथ याची पहिल्या दोन कसोटी सामन्यातील फलंदाजी सुमार राहिली. पहिल्या २ सामन्यात तो साध्या दोन आकडी धावादेखील करू शकला नाही. मात्र सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी करत दमदार पुनरागमन केले. यानंतर त्याने आपली पत्नी डॅनी विलिस हिच्यासोबत आपल्या शानदार शतकाचा आनंद साजरा केला.
आइसक्रीम आणि चित्रपट पाहात स्मिथचे अनोखे सेलिब्रेशन
स्मिथने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी ठेवत सर्वांना या गोष्टीची माहिती दिली. स्मिथने आपल्या स्टोरीमध्ये आइसक्रीमचा फोटो शेअर केला आहे. सोबतच फोटोमध्ये समोर टिव्ही दिसत आहे. तसेच स्मिथ हॉटेलच्या रुममध्ये बेडवर आरामात बसलेला दिसत आहे. स्टोरीमध्ये फोटो शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे की, “शतकानंतरची परंपरा. डॅनी विलिसबरोबर आइसक्रीम आणि एक चित्रपट.”
सिडनी कसोटीत स्मिथचे शानदार शतक
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यात स्मिथने १, १, ०, ८ धावा केल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर टिका केली होती. परंतु स्मिथने धीर न खचता स्वत:वर विश्वास ठेवला आणि सिडनीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात झुंजार शतक करत टिकाकारांची तोंड बंद केली.
सिडनी कसोटी सामन्यातील पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत स्मिथने १३१ धावांची आतिशी खेळी केली. २२६ चेंडूंचा सामना करत १६ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या गाठली. त्याच्या या दमदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात भारताला ३३९ धावांचे आव्हान देऊ शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND v AUS Live : पुजारा-पंतने सावरले; भारताच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राखेर ४ बाद १८० धावा
ब्रिस्बेन कसोटी संदर्भात बीसीसीआयच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावसकर, म्हणाले…
“ही खेळी करून काही लोकांना गप्प करणे आवश्यक होते”, शतकानंतर स्मिथने दिली प्रतिक्रिया