Steve Smith Create History: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025चा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. (SA vs AUS WTC Final 2025) या सामन्यात स्मिथने 112 चेंडूत 66 धावांची शानदार खेळी केली. त्याने त्याच्या खेळीमुळे 99 वर्षांचा जुना रेकाॅर्ड मोडीत काढला. खरंतर, स्मिथ लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज बनला आहे. (Steve Smith creates history at Lord’s)
स्मिथपूर्वी रेकाॅर्ड विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू वॉरेन बार्डस्लीच्या नावावर होता. त्याने 1909 ते 1926 दरम्यान लॉर्ड्सवर 5 कसोटी सामन्यांच्या 7 डावात 575 धावा केल्या. पण आता स्मिथने 591 धावांसह बार्डस्लीला मागे टाकले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून शानदार फलंदाजी करून स्मिथने संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
स्टीव्ह स्मिथच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 116 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 206 डावात फलंदाजी करताना 10,271 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सरासरी 56.74 आहे. दरम्यान त्याने 41 अर्धशतकांसह 36 शतके झळकावली आहेत. त्याच वेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या 239 आहे. (Steve Smith’s Test career)






