इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी ऍशेस कसोटी ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया 138 धावांनी आघाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा शेवटचा स्टीव स्मिथच्या षटकाने झाला. स्मिथ वेळप्रसंगी ऑस्ट्रेलियन संघासाठी गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. पण जास्त गोलंदाजी करायला लागू नये, असी इच्छाच त्याने व्यक्त केली आहे.
लॉर्ड्स कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 416 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आला. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा फिरकीपटू नेथन लायन दुखापतग्रस्त झाला. लायची दुखापत ऑस्ट्रेलियाची चिंता वाढवणारी ठरली. कारण पहिल्या कसोटीत पहिल्या आणि दुसऱ्या डावात त्याने प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या होत्या. लॉर्ड्सवर लायनच्या अनुपस्थितीत ट्रेविस हेड याने पाच षटके टाकली, तर स्टीव स्मिथ (Steve Smith) यायने शेवटचे षटक टाकले.
दुखापतीनंतर लायन लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजी करेल, याची शक्यता खूपच कमी आहे. अशात हेड आणि स्मिथसारक्या पार्ट टाइम गोलंदाजांना त्याच्या कमी भरून काढावी लागू शकते. असे असले तरी, स्मिथने अलिकडच्या काळात आपल्या गोलंदाजीकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले आहे आणि यामुळेच तो जास्त गोलंदाजी करू इच्छित नाही. “आशा आहे की, मला जास्त गोलंदाजी करावी लागणार नाही. मी गोलंदाजीवर जास्त काम करत नाहीये. माझ्या मते ट्रेविस हेडने चांगली गोलंदाजी केली आहे आणि तो जास्त षटके टाकू शकतो.”
दरम्यान, स्मिथचे या लॉर्ड्स कसोटीतील प्रदर्शन पाहिले तर पहिल्या डावात त्याने शतक ठोकले. आपल्या कसोटी कारकिर्दीतील हे स्मिथचे 32 वे शतक होते. एकूण 184 चेंडू खेळून त्याने 15 चौकारांच्या मदतीने 110 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्यये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत स्मिथने आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ यांनीही कारकिर्दीत 32 कसोटी शतके केली होती. (Steve Smith expects not to bowl much in Lord’s Test after Nathan Lyon’s injury)
महत्वाच्या बातम्या –
रहाणेला पुन्हा उपकर्णधार बनवल्याने गांगुली हैराण! माजी कर्णधारचे मोठे विधान
बाद की नाबाद? स्मिथने घेतलेल्या जो रूटच्या कॅचमुळे क्रिकेट जगतात खळबळ