---Advertisement---

स्मिथ-मॅक्सवेलसह दिग्गज खेळाडू घेऊ शकतात ‘या’ महत्त्वाच्या दौऱ्यातून माघार

On: गुरूवार, जून 10, 2021 9:29 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ ९ जुलै ते २४ जुलै २०२१ दरम्यान वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ५ टी२० व ३ वनडे सामने होणार आहेत. सेंट ल्युसिया येथे सर्व टी२० सामने तर बार्बडोस येथे सर्व वनडे सामने होणार आहेत. या दौऱ्यातून ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याचे वृत्त सिडनी मॉर्निंगने दिले आहे. यात स्टिवन स्मिथसह अनेक दिग्गजांचा विश्रांती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश असल्याचे बोलले जात आहे. याला सतत बायो-बबलमध्ये राहण्यामुळे होणारी मानसिक स्थितीही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

सिडनी मॉर्निंगने दिलेल्या बातमीनुसार, स्टिवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मार्कस स्टॉयनिस, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ हे खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे या मालिकेत खेळणार नसल्याचे दिसतेय.

अनेक खेळाडू हे अलगीकरणाचा काळ जास्त असल्यामुळे मानसिक समस्यांसह क्रिकेट खेळत आहे. कोणत्याही दौऱ्यावर गेल्यावर काही दिवस खेळाडूंना अलगीकरणात राहावे लागते. त्यानंतरच त्यांना बायो बबलमध्ये संधी दिली जाते. यामुळे खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होताना दिसतो आहे.

जर वेस्ट इंडिज दौऱ्यात ऑस्ट्रेलियातील हे प्रमुख खेळाडू खेळले नाहीत तर ते पुन्हा थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. कारण यानंतर ऑगस्ट महिन्यात बांगलादेशसोबत ५ टी२० सामने, तर थेट नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानसोबत एक कसोटी सामना तर डिसेंबरमध्ये इंग्लंडसोबत ॲशेस खेळणार आहे. यादरम्यान सप्टेंबर महिन्यात हे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होताना दिसू शकतात. (steve smith glenn maxwell among 8 top Australian players likely miss west indies Bangladesh tours.)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता ट्रेव्हर होन्स यांनी नुकताच २८ खेळाडूंशी संवाद साधला होता. त्यात खेळाडूंनी परदेशातील कोरोना काळातील अनुभव सांगितले. यात खेळाडूंनी बायो बबलमुळे होणाऱ्या परिणामांवर विशेष चर्चा केली. यात बहुतांश खेळाडू हे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी तयार नसल्याचे समोर आले.

होन्सने म्हणाले” खेळाडूंसोबत झालेल्या संवादात असे स्पष्ट झाले की विदेशातील सध्याचे अनुभव, ज्यात बायो बबलच्या सुरक्षितेमध्ये राहणे व अलगीकरणामध्ये राहणे या सर्व गोष्टी खेळाडूंच्या आरोग्यावर प्रभाव टाकतात. खेळाडू, अधिकारी व स्टाफ हे सगळे सर्व प्रथम आपल्या आरोग्यला प्राधान्य देतात. कोविड १९ महामारीमुळे अनेक आव्हाने आपल्या समोर उभी आहेत. या गोष्टींचा प्रभाव हा खेळाडू व संघावर झाला आहे. ”

भारतातील कोविड १९ ची परिस्थिती पाहता अ‍ॅडम झाम्पा, अँड्रयू टाय आणि केन रिचर्डसन यांनी आयपीएल २०२१ च्या हंगामात मधेच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तर काही खेळाडू मात्र आयपीएलच्या शेवटच्या सामन्यापर्यंत भारतात थांबले होते.

ऑस्ट्रेलियाने ६ नवीन खेळाडूंना दिली संधी

ऑस्ट्रेलियाने ८ खेळाडूंची जागा भरण्यासाठी प्राथमिक संघात डॅनियल ख्रिश्चन, कॅमेरून ग्रीन, ऍस्टन अगर, वेज अगर, नॅथन एलिस आणि बेन मॅकडर्मोट या सहा खेळाडूंचा समावेश केला आहे.  १० जुलैपासून ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडीज दौर्‍यावर पाच टी -२० आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यानंतर ऑगस्टमध्ये बांगलादेश दौर्‍यावर पाच टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळतील. टी -२० विश्वचषक तयारीच्या दृष्टीने हे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या

काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती

‘या’ मोठ्या टी२० लीगला जुलैमध्ये होणार सुरुवात, २२ ऑगस्टपर्यंत चालणार स्पर्धा

भारतीय चाहत्यांची खिल्ली उडवणे मॉर्गन-बटलरला पडणार महागात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून होणार निलंबित?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---