भारतीय संघ यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषविणार आहे. वनडे विश्वचषकासाठी मंगळवारी (27 जून) आयसीसीने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषक स्पर्धा सुरू होणार असून 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम विश्वचषकाचे काही महत्वाचे सामने खेळले जातील. ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ यानेही याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली.
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) ची सुरुवात इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यातील सामन्याने होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. स्पर्धेचा अंतिम सामनाही याच स्टेडियमवर खेळला जाणार आहे. स्टीव स्मिथ (Steve Smith) याला ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचेल, असे वाटत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी उतुस्क आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर स्मिथ म्हणाला, “प्रेक्षकांनी भरलेल्या अहमदाबाद स्टेडियमवर भारताविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणे खास असेल. त्यावेळच वातावरण खूपच रोमांचक असेल.”
वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई, दुपारी 2 वाजता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई, दुपारी 2 वाजता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालीफायर 2, 16 ऑक्टोबर, लखनऊ, दुपारी 2 वाजता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, 20 ऑक्टोबर, बेंगलोर, दुपारी 2 वाजता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालीफायर 1, 25 ऑक्टोबर, दिल्ली, दुपारी 2 वाजता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूजीलैंड, 28 ऑक्टोबर, धर्मशाला, सकाळी 10.30 वाजता
इंग्लैंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 4 नोव्हेंबर, अहमदाबाद, दुपारी 2 वाजता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान, 7 नोव्हेंबर, मुंबई, दुपारी 2 वाजता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश, 12 नोव्हेंबर, कोलकाता, सकाळी 10.30 वाजता
दरम्यान, यावर्षी वनडे विश्वचषकात एकूण 48 सामने खेळले जातील. भारतातील एकून 10 वेगवेगळ्या स्टेडियमवर हे सामने आयोजित केले जातील. यात हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बेंगलोर, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. (Steve Smith is eager to play the ODI World Cup final against India)
महत्वाच्या बातम्या –
‘जगदुनिया लक्षात ठेवेल, असं आयोजन करेल भारत…’, वर्ल्डकप 2023पूर्वी ‘दादा’चं ट्वीट चर्चेत
न थांबता सर्वाधिक कसोटी खेळणारा गोलंदाज! दुसऱ्या Ashes सामन्यात नेथन लायनचा महाविक्रम