Loading...

व्हिडिओ: स्टिव्ह स्मिथचा हा ‘मनोरंजक’ फलंदाजीचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

लंडन। लॉर्ड्स मैदानावर सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय येत असल्याने अनेकांची निराशा केली आहे. पण असे असतानाही शुक्रवारी(16 ऑगस्ट) स्टिव्ह स्मिथची फलंदाजी पाहुन अनेकांचे मनोरंजन झाले.

शुक्रवारी पावसामुळे या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबण्याआधी स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 40 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने अनेक चेंडू अनोख्या प्रकारे सोडले.

साधारणत: कसोटी क्रिकेटमध्ये चांगले चेंडू सोडणे ही एक कौशल्य समजले जाते. पण स्मिथने या सामन्यात ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स अशा गोलंदाजांनी टाकलेले चेंडू वेगवेगळ्या प्रकारे सोडल्याचे पाहुन अनेकांना त्यांचे हसू आवरता आले नाही. त्यामुळे स्मिथच्या या खेळीचा हा गमतीशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू एलेक्जेंड्रा हार्टलीनेही स्मिथच्या फलंदाजीचा हा व्हि़डिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच म्हटले आहे की ‘स्टिव्ह स्मिथला चेंडू सोडताना पाहणे ही बर्‍याच काळानंतर मी पाहिलेली सर्वात मनोरंजक गोष्ट आहे.’

Loading...

ऍशेस मालिकेतील या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 258 धावा केल्या.तसेच यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 37.1 षटकात 4 बाद 80 धावा केल्या.

Loading...

तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने फक्त पहिल्या सत्रातच खेळ झाला. त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. या दिवशी स्मिथने 13 धावांवर आणि मॅथ्यू वेड शून्य धावेवर नाबाद होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

संदीप नरवाल प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच खेळाडू

या ५ निकषांच्या आधारावर शास्त्रींची झाली टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी फेरनिवड

भारताविरुद्ध सराव सामन्यासाठी असा आहे विंडीजचा संघ, या दोन महत्त्वाच्या खेळाडूंचाही समावेश

Loading...
You might also like
Loading...