ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ शनिवारी (3 डिसेंबर) पुन्हा एकदा त्यांच्या कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसला. सध्या वेस्ट इंडीज संघ कसोटी मालिकेसाटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका बुधवारी (30 नोव्हेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टीव स्मिथ संघाचे नेतृत्वा करताना दिसला.
सध्या ऑस्ट्रेलियन कसोटी संघाची कमान त्यांचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) सांभाळत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात देखील कमिन्स संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसला, पण चौथ्या दिवशी त्याच्या मांसपेशी तानल्या गेल्याच समजले. याच कारणास्तव स्टीव स्मिथ (Steve Smith) चाहत्यांना पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत पाहायला मिळाला.
वेस्ट इंडीजला या पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी शेवटच्या डावात 498 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी त्यांनी तीन विकेट्सच्या नुकसानावर 192 धावा केल्या आहेत. सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी त्यांना अजून 306 धावांची गरज आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन गोलंदाज राहिलेल्या सात विकेट्स कशा मिळतील, याच प्रयत्नात आहेत.
चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पॅट कमिन्सच्या पायाच्या डाव्या वाजूला वेदाना होत असल्याचे समजले. त्याच्या मांसस्पेशिंमध्ये तान आल्याचे सांगितले गेले आहे, ज्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या डावात तो गोलंदाजी करू शकला नाही. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलंड क्षेत्ररक्षण करताना दिसला, तर स्टीव स्मिथ मोठ्या काळानंतर संघाचे नेतृत्व करू शकला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्स दुसऱ्या डावात गोलंदाजी का केली नाही, याची सविस्तर माहिती दिली. त्याला डाव्या बाजूच्या मांससेशी तानल्या गेल्या असून तो संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत आहे. अशात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच तो या सामन्यात खेळू शकणार आहे. दरम्यान, स्मिथ मागच्या वर्षी उन्हाळ्याच्या हंगामात कर्णधाराच्या रूपात दिसला होता. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकेदरम्यान संघाचे कर्णधारपद सांभाळले होते, जेव्हा नियमित कर्णधार कमिन्सला कोरोनाची लागण झाली होती. (Steve Smith led the Australian team after Pat Cummins was injured.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराटमूळे चहलची कारकीर्द बहरली’, भारतीय दिग्गजाकडून युझी पुन्हा टार्गेट
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाने घेतली बाप लेकाची विकेट, आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम