Steve Smith may retire after WTC final: यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. (Australia vs South Africa) हा सामना 11 जूनपासून खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या वेळी भारताला हरवून WTC फायनल जिंकली होती. दरम्यान ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने फायनलमध्ये मैदानात उतरेल, तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच फायनलमध्ये खेळेल. तत्पूर्वी असे मानले जाते की, या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज निवृत्तीची घोषणा करू शकतो.
आपण येथे दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथबद्दल बोलत आहोत, ज्याने ऑस्ट्रेलियासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत, जो त्याच्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. स्मिथने जगातील जवळजवळ सर्व मैदानांवर आपली उत्कृष्ट फलंदाजी दाखवली आहे आणि भरपूर धावाही केल्या आहेत. भारताव्यतिरिक्त, स्मिथच्या बॅटने अनेक बलाढ्य संघांविरुद्ध दम दाखवला आहे. स्मिथने मार्च 2025 मध्येच वनडे आणि टी20 मधून निवृत्ती घेतली. आता असे मानले जाते की तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर कसोटी फाॅरमॅट देखील सोडू शकतो. (Steve Smith may retire from Test cricket)
36 वर्षीय स्मिथने 2010 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. अशा परिस्थितीत तो त्याच्या 15 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट करू शकतो. स्मिथने अनेक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटची कसोटी मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळली. या मालिकेत स्मिथने कांगारू संघाचे नेतृत्व केले.
स्मिथच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत खेळलेल्या 116 कसोटी सामन्यांमध्ये 56.75च्या सरासरीने 10,271 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने 36 शतकांव्यतिरिक्त 41 अर्धशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे त्याच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत या दिग्गज फलंदाजाने 4 वेळा द्विशतके झळकावली आहेत. त्याच वेळी, 170 वनडे सामन्यांमध्ये, स्मिथने 12 शतकांच्या आधारे 43.28च्या सरासरीने 5,800 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, 67 टी20 सामन्यांमध्ये या खेळाडूच्या बॅटमधून 1,094 धावा आल्या आहेत. (Steve Smith’s international cricket career)






