भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेटने पराभव केला आहे. भारताचा हा पराभव सर्व भारतीय क्रिकेट रसिकांसाठी निराशाजनक आहे. मात्र भारतीय संघाला पराभवापेक्षाही मोठी चिंता सतावत आहे, ती संघसंयोजनाची.
कारण नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेवून भारतात परतणार आहे आणि पहिल्या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे शमी संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. तसेच पृथ्वी शॉ खराब फॉर्मशी झगडत आहे. अशा परिस्थितीत कोणाला संघात संधी द्यायची हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
शमीच्या अनुपस्थीतीत दुसऱ्या सामन्यासाठी कोणत्या खेळाडूला संधी मिळू शकते याबाबत वेगवेगळे क्रिकेट तज्ञ वेगवेगळे मत मांडत आहेत. भारताकडे सध्या मोहम्मद सिराज व नवदीप सैनी हे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज शमीची जागा घेण्यासाठी सज्ज आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथला याबद्दल प्रश्न विचारला असता त्याने स्पष्ट केले की भारताकडे शमीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
पत्रकारांच्या प्रश्नावर स्मिथ म्हणाला ,’माझ्या मते भारताकडे दोन उत्तम गोलंदाज आहेत, ज्यांची कसोटी कारकिर्द निश्चितपणे उत्कृष्ट असणार आहे.’ पण भारतीय संघाला ईशांत शर्माची कमी देखील जाणवेल, कारण अनुभवाच्या दृष्टीने भारतीय संघात थोडीशी कमी जाणवत आहे. स्मिथच्या मते भारतीय संघात मोहम्मद सिराज व नवदीप सैनी हे शमीची जागा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.
पहिल्या सामन्यात फिरकीपटू अश्विन विरुद्ध केवळ 1 धावेवर बाद झाल्यानंतर स्मिथने स्पष्ट केले आहे की, आगामी सामन्यात तो उत्तम कामगिरी करेल. स्मिथ ने हे देखील सांगितले की त्याचे लक्ष पूर्णतः ऑस्ट्रेलियन संघावर असून भारतीय संघ कशाप्रकारे कामगिरी करेल याकडे तो अजिबात लक्ष देत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
स्लेजिंग करणार्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ जबरदस्त खेळ्या
थाटामाटात पार पडला युझवेंद्र चहल-धनश्री वर्माचा विवाहसोहळा, पहा फोटो अल्बम
माजी भारतीय कसोटीपटूने केली ‘या’ खेळाडूची सलामीवीर म्हणून शिफारस