ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंका दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा एकदा नेतृत्वाचा भार सोपवण्यात आला. 2018 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या सॅंड पेपरच्या वादानंतर स्मिथच्या कर्णधारपदावर बंदी घालण्यात आली होती. जेव्हा कमिन्स उपलब्ध नसतो, तेव्हा संघाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात येते. आता आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला कर्णधारपद मिळाले आहे. यावर स्मिथने प्रतिक्रिया दिली.
स्मिथ म्हणाला, “मी अनेकवेळा कमिन्सच्या जागी कर्णधारपद सांभाळले आहे. मी भारताविरुद्ध झालेल्या दोन कसोटीतही संघाचे नेतृत्त्व करत त्याचा आनंद लुटला. मला फिरकी गोलंदाजी करताना परिस्थिती अजून चांगल्या प्रकारे समजते. कोणत्या प्रकारची समीकरणे तयार करावीत याची मी उत्सुकतेने वाट पाहत असतो. श्रीलंका दौरा देखील माझ्यासाठी चांगला असेल अशी आशा आहे.”
35 वर्षीय स्टीव स्मिथने ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्त्व करण्याची पहिलीच वेळ नाही. या अगोदर त्याने 2023 च्या भारत दौऱ्यात दोन सामन्यात संघाचे नेतृत्त्व केले होते. तसेच 2021 मध्ये कमिन्स कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे आढळले, तेव्हा स्मिथने एका सामन्यात नेतृत्त्व केले होते. स्मिथला कर्णधारपद भूषवणे आवडते आणि आजवर मिळालेल्या प्रत्येक आव्हानांना तो सामोरे गेला आहे.
स्मिथ पुढे म्हणाला, “मी आशियामध्ये भरपूर क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मला परिस्थिती चांगल्या प्रकरे समजते आणि त्याबद्दल मी भरपूर माहिती सांगू शकतो.” तो पुढे म्हणाला, “आम्हाला दुबईमध्ये एक छोटं शिबिर घ्यायचं आहे. त्यात सर्व स्पिनर्सला फलंदाजांनी कसे सामोरे जायचे याच्या योजना आखायच्या आहेत.” सध्या स्मिथच्या भविष्याविषयी खूप चर्चा होत आहे, परंतु त्याला नवीन पिढीसाठी मार्गदर्शक बनायचे आहे.
हेही वाचा –
ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज निवृत्त, कसोटी-वनडेत केला होता कहर!
इंग्लंडचा भारतात वनडे रेकॉर्ड खूपच खराब! इतक्या वर्षांपूर्वी जिंकली होती शेवटची मालिका
‘विराटमध्ये खूप क्रिकेट शिल्लक…’, हेड कोच अँडी फ्लॉवरची प्रतिक्रिया, कर्णधारपद मिळणार?