सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन, गाबा येथे खेळला जात आहे. तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ‘स्टीव्ह स्मिथ’ने (Steve Smith) शानदार शतक झळकावले. तर ‘ट्रेविस हेड’ने (Travis Head) देखील धमाकेदार शतक झळकावले. तत्पूर्वी शतक झळकावल्यानंतर स्टीव्ह स्मिथने मोठे वक्तव्य केले आहे.
तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसानंतर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) म्हणाला, “2021 मध्ये कुकाबुराने चेंडू बदलल्याने फलंदाजी करणे निश्चितच कठीण झाले आहे. विशेषत: क्रीझवर येणाऱ्या नव्या फलंदाजांसाठी. खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली तर हा त्रास आणखी वाढतो. जेव्हा चेंडू अधिक स्विंग होईल तेव्हा पहिली 30-35 षटके खेळण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाचा सामना करणे फलंदाजांसाठी आणखी कठीण होऊन बसते.”
पुढे बोलताना स्टीव्ह स्मिथ म्हणाला, “तुम्ही हा कालावधी पार केल्यानंतर तुमच्याकडे ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी सारखे काही आक्रमक फलंदाज आहेत. (जे गोष्टी सोपे करू शकतात) माझ्या कारकिर्दीतील गेली 3 वर्षे कदाचित सर्वात कठीण गेली आहेत. चेंडूच्या अतिरिक्त स्विंगमुळे हे घडले आहे. तुम्ही पाहू शकता की धावसंख्या कशी कमी झाली आहे. फलंदाजीची सरासरी देखील कमी झाली आहे.”
शेवटी बोलताना स्मिथ म्हणाला, “पहिल्या डावावर नजर टाकली तर 5 वर्षांपूर्वी 400 किंवा 500 धावा करणे सोपे होते, पण आता 300 धावा करूनही तुम्ही आजच्या काळात मजबूत स्थितीत आहात. तुम्हाला मोठी धावसंख्या करण्यासाठी नशीब लागेल. तुम्हाला कसोटीनंतर खरोखरच चांगली कसोटी खेळावी लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
28 चेंडूत 12 चौकारांसह अर्धशतक, आरसीबीच्या फलंदाजाची फायनलमध्ये धमाल!
WPL Auction; लिलावात विकले गेले 19 खेळाडू, भारतीय खेळाडूंंनी गाजवले वर्चस्व!
VIDEO : गाबाच्या मैदानावर कोहली-भज्जीचा भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच