ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. हा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचचा शेवटचा वनडे सामना ठरला. ऍरॉन फिंच वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार यामुळे अनेक ऑस्ट्रेलियन चाहते नाराज होते. मात्र, त्यांना या परिस्थितीतही जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने यावेळी त्याच्या वनडे कारकिर्दीतील 12वे शतक झळकावले. संघाला अडचणीतून बाहेर काढणाऱ्या या शतकासह त्याने आपल्या हुशारीचे प्रदर्शनही या खेळीदरम्यान केले.
केर्न्स येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच केवळ 5 धावांवर बाद झाल्यानंतर चाहते नाराज होते. मात्र, त्यानंतर संपूर्ण डावात स्मिथने वर्चस्व गाजवत 131 चेंडूत 105 धावांची विशेष खेळी केली. यावेळी त्याने 1 षटकार आणि 11 चौकार लगावले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 12 वे शतक ठरले. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 बाद 267 धावा केल्या. स्मिथच्या 105 धावांसह मार्नस लाबुशेनने 52 धावांची खेळी केली.
Steve Smith launching a filthy slog over the fence because he knew it was a no-ball due to the number of fielders outside the circle 🤯#AUSvNZ #PlayOfTheDay pic.twitter.com/T3LFFjsCB8
— cricket.com.au (@cricketcomau) September 11, 2022
ऑस्ट्रेलियन डावाच्या 38 व्या षटकात जिमी निशाम गोलंदाजी करत असताना एक मजेदार घटना पाहायला मिळाली. षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्मिथने ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावत षटकार ठोकला. मात्र, दुसऱ्याच क्षणाला त्याने हात उंचावून फ्री-हीटचा इशारा केला. मैदानावरील पंचांचे लक्ष नव्हते की, 30 यार्ड सर्कल बाहेर मर्यादेपेक्षा अधिक क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करत आहेत. स्मिथने ही चूक लक्षात आणून देत, आपली हुशारी दाखवली. मात्र, त्यानंतर मिळालेल्या फ्री हिटचा तो फायदा घेऊ शकला नाही. निशामने एक स्लोअर वन टाकला. ज्यावर स्मिथ एकही धाव घेऊ शकला नाही. हा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी माजी दिग्गजाने निवडला भारतीय संघ! आशिया चषकात नसलेल्या ‘या’ खेळाडूंना दिलंय स्थान
आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर जॉन्टी रोड्सचा भारतीय संघाला विशेष सल्ला! म्हणाला…