ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज स्टीव्ह स्मिथ त्याच्या फुटवर्कने विरुद्ध संघातील गोलंदाजांना गोंधळून टाकतो. आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला स्मिथला आउट करण्याची योग्य गोलंदाजी पद्धत सापडलेली नाही. असे वाटते की, स्मिथ त्याचे मन भरल्यानंतर स्वत:च त्याच्या इच्छेनुसार बाद होतो.
स्मिथ हा कसोटी क्रिकेटमधील जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याची कसोटीतील सरासरी ६२पेक्षाही जास्त आहे. तर, वनडेमध्येही तो ४० पेक्षा जास्त फलंदाजी सरासरीने खेळतो. यावरुन स्मिथची महानता दिसून येते. पण, स्मिथच्या या यशामागचे गुपित खूप कमी लोकांना माहित आहे.
स्मिथ इतर फलंदाजांप्रमाणे त्याच्या फलंदाजी शैलीवर खूप काम करत असतो. तो तास-न-सात सराव करत फलंदाजीचे नवनवे प्रकार शोधत असतो. पण, स्मिथच्या एवढ्या धावांमागील रहस्य हा त्याचा अंधविश्वास आहे.
तो प्रत्येक सामन्यात फलंदाजीला जाण्यापुर्वी एक गोष्ट नक्की करत असतो. ती अशी की, तो नेहमी त्याच्या शूजची लेस आतमध्ये ठेवत असतो. फक्त एवढेच नाही, तर तो लेसला चिकटपट्टीने शूजच्या आतमध्ये चिटकून ठेवत असतो. त्याचे म्हणणे आहे की, शूजचे लेस बाहेर राहिल्यास त्याचे लक्ष विचलित होते. Steve Smith Superstition Of Hiding Shoes Laces For Good Batting.
स्मिथच्या या अंधविश्वासाची सुरुवात २९ एप्रिल २०१६ला आयपीएलमध्ये असताना झाली. याविषयी स्मिथने एका मुलाखतीत सांगितले होते की, आयपीएलच्या पुणे वॉरियर्स संघाचा गुजरात लायन्सविरुद्ध सामना होता. त्या सामन्यात स्मिथने त्याच्या शूजचे लेस आतमध्ये चिकटपट्टीने चिटकवले होते. विशेष म्हणजे, त्यानंतर फलंदाजीला गेल्यानंतर स्मिथने त्याच्या टी२० कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले होते. त्याने केवळ ५४ चेंडूत १०१ धावा करत हा कारनामा केला होता. यात त्याच्या ८ चौकारांचा आणि ५ षटकारांचा समावेश होता. तेव्हापासून स्मिथ त्याच्या शूजची लेस कधीही बाहेर ठेवत नाही.
स्मिथच्या या अनोख्या समजुतीनंतरची आकडेवारी पाहिली तर ती त्याच्या पुर्वीच्या आकडेवारीपेक्षा कमालीची आहे. त्यानंतर स्मिथने ५६ कसोटी सामन्यात १२ शतके आणि १३ अर्धशतके ठोकली. त्याची फलंदाजी सरासरीही पुर्वीपेक्षा जास्त म्हणजे ६६.१७ इतकी होती. शिवाय वनडेत त्याने ४५पेक्षा जास्त सरासरीने २०८० धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतकांचा आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी२०त स्मिथने ८३.३३च्या सरासरीने २५० धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
टेनिस क्रिकेटची पंढरी ‘जुन्नर’ तालुक्यातील क्रिकेटपटूंची ड्रिम ११
रमीज राजाच्या भारत- पाकिस्तान ड्रीम ११मध्ये केवळ १ भारतीय गोलंदाज
सचिनला १९०वर बाद दिले असते तर मला दिले नसते जाऊ हाॅटेलवर