---Advertisement---

लय भारी! अफलातून झेल टिपत कॅप्टन स्मिथने दाखवला पुजाराला तंबूचा रस्ता, पाहा तो व्हिडिओ

On: गुरूवार, मार्च 2, 2023 9:44 PM
---Advertisement---

इंदोर येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात भारतीय संघाला रोखत विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. आता तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी 76 धावांचे आव्हान असेल. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने भारताचा डाव पुढे घेऊन जात असलेल्या चेतेश्वर पुजारा याचा एक शानदार झेल टिपत त्याच्या खेळीवर लगाम लावला.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 88 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय संघाला ही आघाडी भरून काढत मोठी आघाडी मिळवावी लागणार होती. मात्र, ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याच्या पुढे भारताचे प्रमुख चार फलंदाज 78 धावांवर तंबूत परतले होते. तर एका बाजूने चेतेश्वर पुजारा संघर्ष करताना दिसत होता. इतर फलंदाज या खेळपट्टीवर संघर्ष करत असताना पुजाराने 100 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला. 142 चेंडूंना सामोरे जात त्याने 59 धावांची खेळी केली. मात्र, त्याला बाद करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने एक अफलातून झेल टिपला.

 

लायन गोलंदाजी करत असताना पुजाराने डाव्या यष्टी बाहेरच्या चेंडूवर बॅट लावली. तेव्हा लेग स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्मिथने उजवीकडे झेपावत अगदी जमिनीलगतचा चेंडू टिपला.

भारताचा दुसरा डाव केवळ 163 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासाठी नॅथन लायन याने सर्वाधिक 8 बळी टिपले. तर, भारतासाठी चेतेश्वर पुजाराने 59 धावांची खेळी केली. फलंदाजीसाठी अत्यंत अवघड होत असलेल्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे विजयी लक्ष पार करावे लागेल.

(Steve Smith Takes Stunner Of Cheteshwar Pujara In Indore Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने उरकला साखरपुडा, पार्टनरला किस करत जगाला सांगितली आनंदाची बातमी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे 4 खेळाडू; तीन भारतीय सोडले, तर लायन एकमेव ऑस्ट्रेलियन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---