भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमधील मानाची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. सोमवारी (13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याची सांगता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झाली. हा सामना दोन्ही संघांच्या सहमतीने अनिर्णित सोडवला गेला. यासह भारताने मालिका 2-1 ने नावावर केली. अखेरच्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केलेल्या स्टीव्ह स्मिथ याला सामन्यानंतर तू पुन्हा भारतात खेळताना दिसणार काय हा प्रश्न विचारल्यानंतर त्याने मजेदार उत्तर दिले.
ऑस्ट्रेलियाच्या सर्वकालीन महान फलंदाजांमध्ये समावेश असलेला स्मिथ भारतात सातत्याने यशस्वी झालेला पाहायला मिळाला आहे. मात्र, यावेळी फलंदाज म्हणून तो अपयशी ठरला. या मालिकेतील 8 डावात त्याला एकही अर्धशतक झळकावत आले नाही. परंतु, अखेरच्या दोन सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना एक विजय व एक ड्रॉ अशी कामगिरी करून दाखवली.
मी त्याला सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना प्रश्न विचारला गेला की, आम्ही तुला पुन्हा भारतात कसोटी क्रिकेट खेळताना पाहू का? त्यावर हसत हसत तो म्हणाला,
“2027 पर्यंत मी थोडा वयस्कर झालेलो असेल.”काही दिवसांपूर्वी स्मिथने आपण पुढील भारत दौरा करण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले होते. कारण, आता त्याचे वय 33 वर्षांपेक्षा जास्त आहे.
स्मिथने भारतात 2013 पासून 2023 पर्यंत 10 कसोटींच्या 19 डावामध्ये 50.31 च्या लाजवाब सरासरीने 805 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. कर्णधार म्हणून देखील त्याची भारतातील कामगिरी उत्कृष्ट राहिली असून, भारतात सहा कसोटी सामन्यांमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. यामध्ये दोन विजय, दोन पराभव, दोन अनिर्णीत अशी त्याची कामगिरी राहिली. भारतात दोन कसोटी सामने जिंकणारा तो केवळ चौथा कर्णधार आहे.
(Steve Smith Talk On His Return In Border-Gavaskar Trophy 2027 And India Tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी पुरस्कार अन् जडेजाच्या मध्ये ‘हा’ इंग्लिश खेळाडू बनला काटा, सलग दुसऱ्यांदा मारली बाजी
VIDEO | केन विलियम्सन ठरला हिरो! शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयी, भारत WTCच्या फायनलमध्ये