इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा ऍशेस सामना सध्या लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमाणापुढे ऑस्ट्रेलियन संघाला गुडघे टेकण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ याच्यासाठी हा कसोटी कारकिर्दीतील 100वा सामना होता. मात्र, इंग्लिड प्रक्षकांकडून स्मिथला कारकिर्दीतील या महत्वाच्या टप्प्यावर चुकीची वागणूक मिळाल्याचे दिसले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांचा निकाल पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बाजुने लागला. तिसऱ्या सामन्याची सुरुवात मात्र, इंग्लंड संघाच्या इच्छेप्रमाणे झाली. हेडिंग्ले स्टेडियमवर पहिल्या डावात संघाची धावसंख्या 85 असताना ऑस्ट्रलियाच्या चार प्रमुख विकेट्स गेल्या होत्या. पण मिचेल मार्श (Mitchell Marsh) याच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव कसाबसा सावरला. नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 60.4 षटकांमध्ये 263 धावांपर्यंत मजल मारू शकला.
ऑस्ट्रेलियाने कशीबसा 250 धावांचा टप्पा पार केला असला, तरी स्टीव स्मित (Steve Smith) मात्र अपयशी ठरला. स्मिथने 31 चेंडूत 22 धावा करून विकेट गमालली. त्यावेळी स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजी करत होता आणि यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या हातात स्मिथने विकेट गमावली. विकेट गेल्यानंतर स्मिथ जेव्हा पवेलीयनच्या दिशेन चालला होता, तेव्हाच इंग्लिश संघाच्या समर्थकांनी स्मिथला डिवचण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षक स्मिथला चिडिला लावण्यासाठी मोठमोठ्याने आरडत होते. कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात स्मिथला नक्कीचे अशी वागणून अपेक्षित नसावी. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
1️⃣0️⃣0️⃣ up 🇦🇺
A century of Test appearances for Steve Smith 💯 📸 pic.twitter.com/qG7br5UZ4V
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 6, 2023
तत्पूर्वी ऍशेस 2023च्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येही इंग्लिश प्रेक्षकांकडून अशाच प्रकारचे वर्तन पाहायला मिळाले. पहिल्या कसोटीत सीमारेषेजवल श्रेत्ररक्षण करताना स्टीव स्मिथला प्रेक्षकांकडून डिवचण्याचा प्रयत्न झाला होता. प्रेक्षकांनी त्यावेळी स्मिथला 2018 साली झालेल्या ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरणाची आठवण करून देण्यासाठी घोषणाबाजी केली होती. दुसऱ्या कसोटीत जॉनी बेअरस्टोच्या ज्या नाटकीय पद्धतीने बाद झाला, त्यावरून इंग्लिश प्रशिक्षक चिडल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर लॉर्ड्स स्टेडियमच्या लॉन्ग रुममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत धक्काबुक्की आणि चुकीचे वर्तन झाले. अशातच तिसऱ्या ऍशेस सामन्यातही वादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळते.
हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडसाठी मार्क वूड (Mark Wood) हिरो ठरला. वूड ऍशेसच्या पहिल्याच सामन्यात खेळत असून त्याने गुरुवारी (6 जुलै) 11.4 षटकांमध्ये 34 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने सातत्याने ताशी 150 किमीच्या गतीने चेंडू टाकला. दुसऱ्या डावात स्मिथच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल. (Steve Smith, who played his 100th Test match, was insulted by English fans)
महत्वाच्या बातम्या –
आशिया कप-वर्ल्डकपआधीच रंगणार भारत-पाकिस्तानची रंगीत तालीम! या दिवशी रंगणार द्वंद्व
अफलातून! संघाने विश्वचषकात एन्ट्री करण्याची संधी गमावली, पण पठ्ठ्याने 23व्या वर्षी शतक ठोकत घडवला इतिहास