भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेत स्टीव स्मिथला नुकतेच मागे टाकले आहे.
मात्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या म्हणण्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर स्टीव स्मिथ पुन्हा एकादा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करेल.
मार्च महिन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वार्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १२ महिन्यांची बंदी घातली आहे.
“मी स्टीवची फलंदाजी अनेक वर्षांपासून पहातोय. त्याची फलंदाजी सर्वोत्तम आहे, हे मी वेगळे सांगायची गरज नाही. आता जरी तो आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आला असला तरी, जेव्हा तो पुनरागमन करेल तेव्हा तो पुन्हा अव्वल स्थानी विराजमान होईल याची मला खात्री आहे.” असे स्टार्क पत्रकारांशी बोलताना म्हणाला.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ तब्बल गेले ३२ महिने अव्वल स्थानी होता.
मात्र एजबस्टन कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात १४९ तर दुसऱ्या डावात ५१ धावा करत कसोटी क्रमवारीत स्टीव स्मिथला मागे टाकले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
हे दोन भाऊ खेळू शकतात कसोटी मालिकेत एकाच संघाकडून
जय-विरु जोडीतील सचिन तेंडूलकरसाठी सेहवाग नाही तर हा खेळाडू आहे विरु