---Advertisement---

BREAKING! इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज निवृत्ती! तडकाफडकी निर्णय घेण्यामागे आहे ‘हे’ कारण

On: सोमवार, ऑगस्ट 14, 2023 3:59 PM
Steven Finn Stuart Broad
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टीवन फिन आता पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही. 34 वर्षीय स्टीवन फिन याने 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आणि आता निवृत्तीची घोषणा केली. मागच्या मोठ्या काळापासून तो दुखापतीचा सामना करत असून क्रिकेट खेळू शकला नव्हता. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (14 ऑगस्ट) त्याने निवृत्तीची घोषणा केली.

निवृत्तीची घोषणा करताना स्टीवन फिन (Steven Finn retirement) याने संगितले की, “क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून आज मी तत्काळ निवृत्ती घेत आहे. मागच्या 12 महिन्यांपासून मी माझ्या शरीराशी लढा देत आहे आणि पराभव स्वीकारला आहे.” गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्टीवन फिन मागच्या मोठ्या काळापासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नव्हता. दरम्यानच्या काळात त्याने दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न केले. पण पुन्हा मैदानात पूर्वीप्रमाणे खेळण्याची शक्यता नाही, म्हणूनच त्याने निवृत्ती घेतल्याचे सांगितले जात आहे.

त्याच्या कारकिर्दीतीवर नजर टाकली, तर त्याने इंग्लंडसाठी 36 कसोटी, 69 वनडे आणि 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या तिन्ही प्रकारांमध्ये त्याने अनुक्रमे 125, 102 आणि 27 विकेट्स घेतल्या आहेत.  फिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 मार्च 2010 रोजी केले होते बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात केले होते. त्यानंतर 30 जानेवारी 2011 मध्ये त्याने पहिला वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. टी-20 क्रिकेटमधील पदार्पण फिनने 2011 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध केले होते.

इंग्लंडसह फिनने मिडलसेक्स आणि ससेक्स या काउंटी संघांसाठीही दीर्घकाळ क्रिकेट खेळले. फिनची आकडेवारी पाहते हे समजते की, वेगवान गोलंदाजाला दुखापतींचा सामना करावा लागला नसता तर तो इंग्लंड संघाचा नियमित सदस्य असू शकत होता. फिनने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही. (Steven Finn has announced his retirement from of cricket.)

बातमी अपडेट होत आहे…
कुलदीपने गाजवला कॅरेबियन दौरा! भेदक गोलंदाजीने मिटवलं वर्ल्डकपचे टेन्शन
आशिया कप 2023 पूर्वीच पाकिस्तान बनू शकतो नंबर 1 वनडे संघ, जाणून घ्या कसा?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---