---Advertisement---

बापरे! तब्बल ४९६ सामने खेळलेल्या स्मिथच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

On: मंगळवार, सप्टेंबर 22, 2020 9:38 PM
---Advertisement---

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील चौथा सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत एमएस धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतू राजस्थानच्या संजू सॅमसन, स्टिवन स्मिथ व जोफ्रा आर्चरने हा निर्णय अयोग्य ठरवत चेन्नईची चांगलीच धुलाई केली.

राजस्थानने निर्धारित २० षटकांत ७ बाद २१६ धावा करताना चेन्नईच्या जवळपास सर्वच फलंदाजांची चांगलीच धुलाई केली. संजू सॅमसनने ३२ चेंडूत ७४, स्टिवन स्मिथने ४७ चेंडूत ६९ तर जोफ्रा आर्चरने ८ चेंडूत २७ धावा केल्या. या सामन्यात राजस्थानकडून १७ षटकारांची बरसात पहायला मिळाली. विशेष म्हणजे या तीन खेळाडूंनी मिळूनच हे १७ षटकार मारले.

या सामन्यात स्टिवन स्मिथ पहिल्यांदाच सलामीला (ओपनिंगला) फलंदाजीला आला होता. तब्बल ४९६ व्यावसायिक सामने खेळलेला ३२ वर्षीय स्मिथ १४ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सलामीला फलंदाजीला आला होता.

१४ वर्षांच्या कारकिर्दीत स्मिथने १३१ प्रथम श्रेणी, १७२ अ दर्जाचे व १९२ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळले. यात ७३ कसोटी, १२५ वनडे व ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचाही समावेश आहे.

एकेवेळी गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारा व खालच्या फळीत फलंदाजीला येणाऱ्या कसोटी क्रिकेटमधील या दिग्गज क्रिकेटरला सलामीला फलंदाजीला यायला तब्बल ४९६ सामने लागले हे विशेष.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---