---Advertisement---

अखेर विश्वचषक पराभवावर केन विल्यमसनने केले मोठे भाष्य

---Advertisement---

मुंबई | मागील वर्षी २०१९ साली झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचे शल्य न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराला आजही होत आहे. कर्णधार केन विल्यमसन म्हणतो की, ‘हा पराभव माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे की माझे अपयश? याचा उलगडा अद्याप झाला नाही. हा पराभव कशामुळे झाला? हे देखील मला समजत नसल्याचे त्याने सांगितले.

मागील वर्षी २०१९ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मर्यादित घटक आणि सुपर ओव्हरमध्ये ही सामना टाय झाल्याने सर्वाधिक चौकार आणि षटकाराच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. याच सामन्याविषयी केन विल्यम्सन बोलत होता.

केन विल्यम्सन क्रिकबझ एका संकेतस्थळावर हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना म्हणाला की, ती वेळ चांगली होती का वाईट हे ओळखण्यास थोडा वेळ लागेल. मी अजून देखील त्याचा शोध घेतोय. आमच्या कष्टाचे फळ आम्हाला मिळाले नाही. पण हा सामना फारच रोमांचकारी झाला. या पराभवातून बाहेर पडणे खूपच अवघड झाले आहे. जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. प्रत्येक सामन्यात काही ना काही वेगळे घडत असते. त्यावर आपले नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे.

न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २४१ धावा केल्या होत्या. विजयाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ढेपाळला होता. मात्र बेन स्टोकने संघाला एक स्फोटक खेळी करून सामना बरोबरीत करून दिला. त्यामुळे हा सामन्यात सुपरओवर खेळविण्यात आला. इंग्लंड यात प्रथम फलंदाजी करताना १५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही १५ धावा केल्या.

सर्वाधिक चौकार आणि षटकार ठोकल्याने या सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. आणि न्यूझीलंडचे पहिल्यांदा विश्वचषक किताब जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.
गतवर्षी पहिल्यांदाच इंग्लंडच्या रूपात एका नव्या संघाने आयसीसीचा विश्वचषक जिंकला. यापूर्वी वेस्ट इंडीज भारत ऑस्ट्रेलिया पाकिस्तान श्रीलंका या संघाने आयसीसीचा विश्वचषक जिंकला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---