बिस्ट्रॉल नाईट क्लब मध्ये केलेल्या मारामारी प्रकरणामुळे बंदी घालण्यात आलेला बेन स्टोक्स संघ निवडीसाठी उपलब्ध असेल असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये या विषयी म्हटले आहे. या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, ” क्रिकेट बोर्डाच्या चर्चेमध्ये बेन स्टोक्सचा पुढच्या संघनिवडीसाठी विचार केले जाईल असे इसीबीने मान्य केले आहे.”
बेन स्टोक्स बरोबरच रायन अली आणि रायन हेल या दोघांनाही सीपीएसने बिस्ट्रॉल नाईट क्लब मारामारी प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोर्टमध्ये जाणार आहे. याविषयी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (एसीबी) म्हटले आहे की या प्रकरणाचा स्टोक्सविषयीचा निर्णय होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे या काळात स्टोक्स इंग्लंड क्रिकेटसाठी उपलब्ध नसणे योग्य ठरणार नाही.
बिस्ट्रॉल नाईट क्लब मारामारी प्रकरण सप्टेंबर महिन्यात घडले होते. तेव्हापासून स्टोक्स इंग्लंड क्रिकेटसाठी उपलब्ध नाही. या काळात इंग्लंड विंडीज विरुद्ध वनडे मालिका आणि नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍशेस मालिका खेळले. या दोन्ही मालिकांसाठी बेन स्टोक्स संघात नव्हता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सध्या चालू असलेल्या वनडे मालिकेतही बेन स्टोक्स खेळत नाही.
एसीबीने पुढे म्हटले आहे, “एसीबी कायदेशीर प्रक्रियेचे आणि खेळाडूचे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याच्या उद्देशाचे पूर्ण आदर करते”
इंग्लंड निवड समितीचे सदस्य, व्यवस्थापन आणि खेळाडू यांना कळवण्यात आले आहे की बेन स्टोक्स फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० सामन्यासाठी संघात असण्याची शक्यता आहे.”
या प्रकरणाविषयी काल बेन स्टोक्सने ट्विटरवरून स्टेटमेंट दिले होते.