लंडन | भारताविरुद्ध १२ ते १७ जूलै दरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने आपला १४ खेळाडूंचा संघ घोषीत केला आहे.
या संघातून सॅम बिलिंग आणि सॅम करण यांना वगळण्यात आले आहे तर बेन स्टोक्सचे या संघात पुनरागमन झाले आहे. तो न्युझीलंड मालिकेनंतर प्रथमच वनडेत खेळणार आहे.
८ जूलै रोजी होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यातही बेन स्टोक्सला खेळण्याची संधी मिळणार आहे. परंतु तत्पुर्वी त्याला फिट असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.
ख्रिस वोक्स अजूनही जखमी आहे. त्यानेही फिट असल्याचे सिद्ध केले तर वनडे मालिकेत शेवटच्या एक किंवा दोन सामन्यात त्याचा समावेश करण्यात येणार आहे.
भारताविरुद्ध होत असलेल्या तीन वनडे सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ-
इयान माॅर्गन (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टाॅ, जॅक बेल, जाॅश बटलर, टाॅम करण, अॅलेक्स हेल्स, लायम प्लंकेट, अदिल राशिद, जो रुट, जेसन राॅय, बेन स्टोक्स, डेविड विले, मार्क वुड
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा
टी२० मालिका
पहिला सामना- ०३ जूलै, मॅंचेस्टर, रात्री १० वाजता
दुसरा सामना- ०६ जूलै, कार्डिफ, रात्री १० वाजता
तिसरा सामना- ०८ जूलै, ब्रिस्टल, रात्री ६.३० वाजता
वनडे मालिका
पहिला सामना- १२ जूलै, नॉटिंगहॅम, सायंकाळी ५ वाजता
दुसरा सामना- १४ जूलै, लंडन (लोर्ड्स), दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
तिसरा सामना- १७ जूलै, लीड्स, सायंकाळी ५ वाजता
कसोटी मालिका
पहिला सामना- ०१ आॅगस्ट ते ५ आॅगस्ट, बर्मिंगहॅम, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
दुसरा सामना- ०९ आॅगस्ट ते १३ आॅगस्ट, लंडन (लोर्ड्स), दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
तिसरा सामना- १८ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट, नॉटिंगहॅम, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
चौथा सामना- ३० आॅगस्ट ते ०३ सप्टेंबर, साउथॅंप्टन, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
पाचवा सामना- ०७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर, लंडन (ओव्हल), दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
महत्त्वाच्या बातम्या:
–शिखर धवन मोडणार हिटमॅन रोहितचा ‘गब्बर’ विक्रम
–टॉप- ५: जगातील हे दिग्गज क्रिकेटपटू चष्मा घालून खेळायचे क्रिकेट!
–आठवतंय का? आजच्याच दिवशी ११ वर्षींपुर्वी सचिनने केलेला भीमपराक्रम