मुंबई । अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या स्फोटक खेळीमुळे इंग्लंडने सोमवारी दुसर्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला 113 धावांनी पराभूत केले. इंग्लंडने मालिकेत पुनरागमन करत 1-1 अशी बरोबरी केली. दरम्यान, एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बेन स्टोक्स गोलंदाजी करत अचानक सीमारेषाकडे धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
झाले असे की शेवटच्या डावात ४२ व्या षटकात विंडीज संघाचा फलंदाज ब्लॅकवुड फलंदाजी करीत होता. त्याने स्टोक्सच्या गोलंदाजीवर मिड ऑफवर फटका मारला. चेंडू चौकारासाठी बाऊंड्री लाइनच्या दिशेने जात होता.
या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नसल्याने बॉल फेकल्यानंतर स्टोक्स स्वत: सीमारेषाच्या दिशेने पळाला आणि त्याने सूर मारून चौकार रोखला. त्याचे क्षेत्ररक्षण पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सोशल मीडियावरील चाहत्यांनीही स्टोक्सच्या या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले.
There's commitment.
And there is Ben Stokes' idea of commitment.
Highlights of yesterday's win 👉 https://t.co/j13W3a7KgX pic.twitter.com/YYl5UeK9yk
— England Cricket (@englandcricket) July 21, 2020
या कसोटी सामन्यात स्टोक्सने दुसऱ्या डावत 57 चेंडूत नाबाद 78 धावा फटकावल्या. ज्यात तीन षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. कर्णधार जो रूटसह त्याने पहिल्या 43 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली.
आता तिसरा आणि अंतिम कसोटी सामना 24 जुलैपासून मँचेस्टर येथे खेळला जाईल.
ट्रेंडिंग घडामोडी –
३० वेळा आठवण करुन देऊनही मुंबई क्रिकेट असो. पोलीसांचे पैसे काही देईना
पराभवाचे पोस्टमार्टम झाले सुरु, या दोन क्रिकेटरला धरावा लागणार संघाबाहेरचा रस्ता
यापुढे षटकार किंग म्हणून रोहित नाही तर स्टोक्सला ओळखले जाणार, पहा काय आहे कारण…