---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजा- पंड्याचे खेळणे कठीण, पहा कोण म्हणतंय

On: मंगळवार, जुलै 21, 2020 4:55 PM
---Advertisement---

भारतीय संघ यावर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना गाबा येथे ३ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्चनंतर भारतीय संघाने कोणताही सामना खेळलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला अजून बरेच महिने बाकी आहेत. परंतु याबाबत सातत्याने चर्चा केली जात आहे.

भारतीय संघाबद्दलही बऱ्याच चर्चा केल्या जात आहेत जसे की सलामीला पृथ्वी शॉ खेळणार का? यष्टीरक्षक फलंदाज म्हणून वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत यांपैकी पहिली पसंत कोण असेल? अष्टपैलू म्हणून आर अश्विन (R Ashwin), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हे तिघेही एकत्र संघामध्ये फीट होतील का?, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) या मालिकेसाठी भारतीय संघाच्या संघबांधणीबद्दल (कॉम्बिनेशन) आपले मत स्पष्ट केले आहे.

‘दोन खेळाडूंच्या खेळण्याची शक्यता नाही’

चोप्राचे असा विश्वास आहे, की या कसोटी मालिकेत जडेजा आणि पंड्याला अंतिम अकरा जणांमध्ये स्थान मिळविणे खूप कठीण होईल. एका चाहत्याने चोप्राला विचारले, की ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पंड्या आणि जडेजा एकत्र भारतीय संघाच्या अंतिम अकरा जणांमध्ये फीट होतात का?, या प्रश्नाचे उत्तर देताना चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये म्हटले, “मला वाटत नाही की यांपैकी एकही खेळाडू खेळू शकेल. कारण पंड्या अद्याप कसोटी संघात स्थान मिळवू शकेल, असे मला नाही वाटत.”

“पंड्याला पाठीची दुखापत आहे, अद्याप त्याने गोलंदाजी करणे सुरू केलेली नाही. त्याने वनडे सामनाही खेळलेला नाही. तो टी२०मध्ये खेळू शकतो. परंतु आयपीएलमध्ये खेळल्यानंतर तुम्ही त्याला कसोटी सामन्यात खेळवणार का? तो कसोटी क्रिकेटसाठी तयार आहे का? तसेच त्याला आता कसोटी क्रिकेट खेळायचे आहे का? या सर्व कारणांमुळे मला नाही वाटत की तो ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटी सामना खेळेल,” असेही चोप्रा पुढे म्हणाला.

‘अश्विन आणि कुलदीपला मिळू शकते संधी’

“मला वाटते की जडेजापूर्वी अश्विन आणि कुलदीप यादव यांच्यावर नजर टाकायला आवडेल. कारण कुलदीप मनगट फिरकीपटू आहे, ज्याने मागील वेळी ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना ५ विकेट्स चटकावले होते. त्यानंतर त्याला संघात सामील केले गेले नाही. त्यामुळे त्याला आणखी एक संधी मिळू शकते. तुम्ही अश्विनला कसे काय विसरू शकता, त्यालादेखील एक संधी मिळू शकते. जडेजा आणि पंड्याबरोबर खेळण्याची गोष्ट विसरून जावा,” असे अश्विन आणि कुलदीपबद्दल बोलताना चोप्रा म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-३० वेळा आठवण करुन देऊनही मुंबई क्रिकेट असो. पोलीसांचे पैसे काही देईना

-प्रेक्षकांचा आवडता ऑस्ट्रेलियन खेळाडू दारुमुळे संपला

-आयसीसी क्रमवारीतही स्टोक्सची फटकेबाजी, पहा कोण आहे कोणत्या जागी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---