इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम संपायला आला आहे. साखळी फेरी सामन्यांचा टप्पा पार पडला असून मंगळवारपासून (२४ मे) प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी कोलकातामध्ये काल बैसाखी वादळाचा तांडव पाहायला मिळाला आहे. यामुळे हा सामना स्थगित होण्याची दाट शक्यता आहे.
कोलकातामध्ये (Kolkata) आलेल्या काल बैसाखी वादळामुळे सोसाट्याचा वारा सुटला होता. ज्यामुळे ईडन गार्डन स्टेडियममधील (Eden Garden Stadium) प्रेस बॉक्सच्या काचा तुटून पडल्या आहेत. यानंतर हा सामना स्थगित होण्याचे संकट ओढावले आहे. खराब वातावरणामुळे खेळाडूंना सराव करायलाही त्रास होत आहे. यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने कोलकात्याचा दौरा केला आहे. गांगुलीने आश्वासन दिले आहे की, क्वालिफायर सामन्यापूर्वी सर्व गोष्टी पूर्णपणे ठीक केल्या जातील. याखेरीज या वादळामुळे सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यताही वाढली आहे. अशात पावसामुळे सामन्यादिवशी दर्शकांना निराशेला सामोरे जावे लागू शकते.
कोलकात्यात वादळासह जोरदार पाऊस
काल बैसाखी वादळामुळे कोलकात्यात वादळ आणि जोरदार वाऱ्यासह मुसळदार पाऊस पडत आहे. ईडन गार्डन्सवरील प्रेस बॉक्सच्या काचा तुटण्याबरोबर पूर्ण मैदानात पाणी भरले आहे. जाहिरात होर्डिंगचेही नुकसान झाले आहे. ग्राउंड कव्हरचा एक भागही तुटला आहे.
After 90km/hr storm bcci president watching #eden gardens on 21st May 2022. pic.twitter.com/3yRKBEg6cJ
— Agni Pandey (@PandeyAgni) May 21, 2022
वातावरणामुळे प्लेऑफ सामन्यांच्या नियमांमध्ये बदल
नियमांप्रमाणे प्लेऑफचा कोणताही सामना किमान पाच षटकांचा खेळला गेला पाहिजे. जर रात्री १२.२६ मिनिटांपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही, तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून सामन्याचा निकाल काढला जाईल. पण जर सुपर ओव्हर देखील होऊ शकली नाही, तर गुणतालिकेच्या हिशोबाने पुढचा निर्णय घेतला जाईल. एलिमिनेटर आणि क्वालीफायर सामन्यासाठी एकही दिवस राखीव ठेवला गेला नाहीये, पण अंतिम सामन्यासाठी मात्र एक दिवस राखीव ठेवला गेला आहे.
असे होणार आहेत प्लेऑफ्सचे सामने
दरम्यान प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर (Qualifier 1) सामना गुजरात व राजस्थान (Gujrat Titans vs Rajasthan Royals) संघांमध्ये कोलकाता येथे होणार आहे. हा सामना २४ मे रोजी होईल. त्यानंतर २५ मे रोजी लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात कोलकातामध्येच एलिमिनेटर सामना रंगणार आहे. त्यानंतर २७ मेला क्वालिफायरचा दुसरा सामना होईल व शेवटी २९ मे रोजी अंतिम सामन्यासह स्पर्धा संपेल
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
उमरानची भारतीय संघात निवड झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष, वडिलांनीही देशाचे मानले आभार
सुरेश रैना म्हणतोय आरसीबीने जिंकावे आयपीएल; कारण ऐकून व्हाल चकीत
Video: थोडक्यात बचावला राजस्थान संघ! कोलकाताला जाताना विमान प्रवासादरम्यान टळले मोठे संकट