मसाला क्रिकेट म्हणून टी२० क्रिकेट सुरू झालं अन् त्याला आयपीएलची फोडणी बसली. धमाकेदार खेळ आणि आयपीएलच्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींनी जबरदस्त टीआरपी मिळवला. आयपीएलने जितकी लोकप्रियता मिळवली, तितकेच वाद आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात झाले. दरवर्षी काही ना काहीतरी वेगळ घडत राहतच. असाच एक वाद २०१३ ला घडला. स्पॉट फिक्सिंगचा नव्हे तर त्याच्या आधीचा. विराट कोहली गौतम गंभीरचा वाद.
आयपीएल २०१३ ची सुरुवात झालेली. सीझनची बारावी मॅच होती आरसीबीच्या होम ग्राउंडवर, चिन्नस्वामीवर आरसीबी आणि केकेआरची. त्या सिझनला विराट पहिल्यांदाच कॅप्टन झालेला. मॅच सुरू झाली अन् पहिल्यांदा बॅटिंग करताना केकेआरच्या गाडीने काही स्पीड पकडला नाही. एकटा कॅप्टन गंभीर लढला. युसूफ पठाण आणि मनोज तिवारीन फक्त स्कोर बोर्डला नावापुरता धक्का देण्याचं काम केलं. गंभीरच्या फिफ्टीने गाडी १५४ पर्यंत पोहोचली.
दुसरी इनिंग सुरू झाली अन् गेलने केकेआरच्या बॉलर्सला काहीच सुचू दिलं नाही. मोकार दहशती फॉर्ममध्ये असलेल्या गेलने केकेआरच्या बॉलिंग लाईन अपची दाणादाण उडवली. दुसरा ओपनर मयंक अग्रवाल ६ रनांच्या पुढे गेला नाही आणि आऊट झाला. ग्राउंडवर उतरला कॅप्टन विराट कोहली. त्याने गेलला फ्रीहँड दिला अन् दुसर्या बाजूनं टप्प्यात आला की बॉल बाहेर मारू लागला. ९ ओवर संपल्यावर आरसीबीचा स्कोर होता ७५.
हेही पाहा- जेव्हा विराट गेलेला गंभीरच्या अंगावर धावून
दहावी ओव्हर घेऊन आला अनुभवी लक्ष्मीपती बालाजी. त्याने टाकलेला लेन्थ बॉल कोहलीने एक्स्ट्रा कव्हरचा डोक्यावर मारायचा प्रयत्न केला, आणि तिथं उभ्या असलेल्या ओएन मॉर्गनने सिम्पल कॅच पकडला. केकेआरचे प्लेयर जल्लोष करायला लागले. इतक्यात कॅमेरा आऊट होऊन चाललेल्या विराटवर पॅन झाला. विराट कोणाला काहीतरी बोलत असल्याचे दिसून आले, पण त्यानंतर दिसलेले चित्र शॉकिंग होते. केकेआरचा कॅप्टन गंभीर आणि आरसीबीचा कॅप्टन विराट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आता यांच्यात टसन होतेय का काय? असं वाटत असतानाच. केकेआरसाठी खेळणारा रजत भाटिया मधे पडला आणि त्याने दोघांना बाजूला ढकलले. दोन दिल्लीकरांच्या मध्ये तिसरा दिल्लीकर आल्याने वाद तिथं थांबला.
पुढं एक रिप्ले दाखवला त्यात गंभीर कोहलीला काहीतरी बोलताना दिसला. सगळ्यांना वाटलं चूक गंभीरचीच आहे. पुढे काही वेळात मॅच संपली आणि आरसीबी जिंकली. मॅच संपल्यावर मात्र विराट आणि गंभीर एकमेकांच्या हातात हात देताना दिसले आणि सगळ्यांना कळून चुकलं की, हे पेल्यातील वादळ होतं जे शांत झालयं. मॅच नंतर दोघांनी एकत्र डिनर केल्याचीही बातमी आली.
ही भांडणे पुढे वाढू न देणाऱ्या रजत भाटियान सांगितलं, “याची इतकी चर्चा करायची गरज नाही, मॅचमध्ये या गोष्टी घडत असतात.” पुढे काही वर्षांनी गंभीरने या वादावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, विराट पहिल्या इनिंगमध्ये माझ्या संघाला स्लेज करत होता. यावेळी मी त्याला स्लेज केलं. त्याला राग नव्हता यायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळी दुसऱ्याला डिवचता तेव्हा तुम्हाला कोणी डिवचल्यावर ते सहन करता आले पाहिजे. ती घटना पुन्हा रीक्रिएट केली तरी, मी माझ्या संघाच्याच बाजूने असेल.”
विराट अन् गंभीरच्या नावासमोर हा वाद दिसला असला तरी, ते अत्यंत जवळचे मित्र आहेत ही गोष्ट कधीही लपून राहिली नाही. खरंतर गंभीर विराटला सीनियर, पण दोघांनी खूप क्रिकेट, आधी दिल्लीसाठी आणि नंतर टीम इंडियासाठी एकत्र खेळले. इतकंच काय जेव्हा विराटने आपलं पहिल इंटरनॅशनल शतक मारलं तेव्हा, गंभीरने आपला स्वतःचा मॅन ऑफ द मॅच अवार्ड विराटला दिला होता. आजही विराट गंभीरची आणि गंभीर विराटची तितकीच इज्जत करतो. असं असलं तरी त्या एका छोट्याशा वादामुळे अनेकांना त्यांच्या अखिलाडूवृत्तीवर बोट ठेवायची, आयती संधी अनेकांना मिळाली होती, तेही तितकच खरं.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कहाणी ‘दादा’लाच केकेआरमधून बाहेर काढण्याची, काय होतं गांगुलीला संघातून काढण्यामागील कारण
शंभर नाही, तर दीडशेहून अधिक मॅच खेळले, पण कर्णधार पदापासून नेहमीच वंचित राहिले ‘हे’ भारतीय खेळाडू
लईच वाईट राव! ५ विस्फोटक भारतीय खेळाडू, पण त्यांच्या नशिबात वर्ल्डकपची एकही मॅच नव्हती