भारतीय क्रिकेट संघ शनिवार दि.23 जूनला तीन महिन्यांच्या अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विश्रांतीनंतर ब्रिटन दौऱ्यावर गेला.
या ब्रिटन दौऱ्याची सुरूवात भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळून करणार आहे.
त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन टी-20, तीन एकदिवसीय आणी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय संघासाठी 2019 मध्ये इंग्लंडमध्ये होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने हा इंग्लंड दौरा महत्वाचा आहे.
त्यादृष्टीने भारतीय संघाने लंडनमध्ये पोहचताच जिममध्ये जाऊन घाम गाळत या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
याची माहिती भारतीय संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम आकाउंटवरून बीसीसीआयने दिली.
All set 💪💪#TeamIndia pic.twitter.com/iEJ9uHMJUR
— BCCI (@BCCI) June 24, 2018
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हीडीओमध्ये कर्णधार विराट कोहली, मनिष पांडे, युजरवेंद्र चहल आणि कुलदीप यादव जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत.
भारतीय संघ 27 आणि 29 जुलैला आयर्लंड विरुद्ध टी-20 मालिका झाल्यानंतर 3 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध टी-20 मालिकेस सुरवात करणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
–आपण जर आयपीएल फॅन असाल तर ही आहे आपल्यासाठी महत्त्वाची…
-टॉप 5: हे भारतीय खेळाडू पहिल्यांदाच करत आहेत इंग्लंड दौरा