---Advertisement---

भारतीय खेळाडूंच्या जर्सी नंबरमागील फंडा आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

On: मंगळवार, जून 14, 2022 7:23 PM
Sachin-Tendulkar-And-Yuvraj-Singh-And-MS-Dhoni
---Advertisement---

मंडळी, तुम्हाला एखादा क्रिकेटर आवडत असेल, तर त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला आकर्षिक करतात. आता आपण एमएस धोनीचं उदाहरण घेऊ. समजा मला लहानपणापासून धोनी आवडतो. धोनीची बॅटिंग आवडते. त्याचे जुने मानेपर्यंत रुळणार्या केसांची स्टाईलही करावीशी वाटायची. मात्र, त्याहीपेक्षा त्याच्या ७ क्रमांकाच्या जर्सीचे जास्त आकर्षण आहे, पण नंतर मला धोनी ७ नंबरचीच जर्सी का घालत असेल असा प्रश्न पडला? त्याच्या सोबतीला आणखी प्रश्न पडले की, प्रत्येकाच्या ‌जर्सी नंबरचं काहीतरी कारण असेल? किंवा यांचे हे नंबर ठरवतो कोण? मग याचा शोध घेतला आणि साऱ्याची उत्तरे मिळाली, तर मंडळी त्याच प्रश्नांची उत्तरं आपण या लेखातून जाणून घेऊयात.

तर, क्रिकेटर्सने कोणता नंबर घ्यायचा कोणता नाही हे सर्वस्वी ते क्रिकेटरच ठरवतात. कोणी आपल्या बर्थडेचा, कोणी वडिलांच्या-आईच्या वाढदिवसाचा, कोणी असाच रॅण्डम तर‌ कोणी खास न्यूमरॉलॉजिस्टकडे जाऊन जर्सी नंबर बनवून घेतला. खरंतर क्रिकेटमध्ये या जर्सी नंबरच फॅड आणलं ऑस्ट्रेलियाने. १९९६ला त्यांनी पहिल्यांदा नंबर असलेली जर्सी वापरली.. नंतर आयसीसीने १९९९ वर्ल्डकपला नंबर वाली जर्सी कंपलसरी केली. आता बाकीच्या देशातील क्रिकेटर्स जर्सी नंबरसाठी काय लॉजिक लावतात हे आपल्याला माहित नाही, पण आपल्या क्रिकेटर्सनी मात्र वेगवेगळी लॉजिक, श्रद्धा-अंधश्रद्धा वापरल्या आणि आपले जर्सी नंबर फिक्स केले.

हेही पाहा- लोकांचे वाजतात १२, पण युवीने का निवडलाय जर्सी नंबर १२?

ज्या जर्सी नंबरला फक्त इंडियन क्रिकेटच नाहीतर, साऱ्या क्रिकेट जगतातच अक्षरश: पूजले जाते ती जर्सी म्हणजे, विक्रमादित्य सचिन तेंडुलकरची १० नंबरची जर्सी. सचिन रिटायर होऊन दहा वर्ष होत आली तरी,‌ त्या जर्सीची मागणी काही कमी झाली नाही. सचिन जेव्हा क्रिकेट खेळू लागला, तेव्हा वनडे आणि टेस्ट व्हाईट किटमध्ये व्हायचं. जेव्हा जर्सी नंबरची संकल्पना आली, तेव्हा सचिनने ९९ नंबर पासून सुरुवात केली. असंच त्याला एकदा एका न्यूमरॉलॉजिस्टने १० नंबर वापरायचा सल्ला दिला. सचिनने तो मान्य केला आणि तिथून पुढे तो क्रिकेट जगतावर राज्य करू लागला. फॉर्म गंडला होता, तेव्हा सचिनने बेजान दारूवालांच्या सांगण्यावरून थोडे दिवस १९ नंबर ट्राय केला, पण कार्यक्रम काही जुळला नाही आणि शेवटी सचिन शेवटपर्यंत १० नंबरवरच कायम राहिला. त्याच्याबरोबरच इंडियन क्रिकेटमधून १० नंबरची जर्सीही रिटायर झाली.

सचिननंतर ज्या जर्सीला सर्वात जास्त मान आणि प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे थाला धोनीची. धोनीचे ७ नंबरची जर्सी घेण्याचे सिंपल लॉजिक. एकतर त्याचा बड्डे ७ जुलैचा आणि तो आधीपासून फूटबॉलर असल्याने त्याला आवडनाऱ्या डेव्हिड बेकहॅमचा नंबर ही ७. म्हणून धोनीचाही ७, आणि वर्ल्ड क्रिकेटवर त्याची सत्ता. सगळ्यात इंटरेस्टिंग नंबर आपल्या सिक्सर किंग युवीचा. त्याच्या नंबर १२ मागे लॉजिकची रांगच रांग. त्याची जन्मतारीख १२. बारावा महिना. जन्माचा टाईम दुपारच्या बाराचा आणि ठिकाण चंदिगडचे सेक्टर बारा.

टीम इंडियात‌ सध्या तीन सर्वात सीनियर प्लेयर कोण तर कॅप्टन रोहित शर्मा, द विराट कोहली आणि सर रवींद्र जडेजा. या तिघांच्या नंबरची देखील वेगवेगळी कथा आहे. रोहितने जेव्हा अंडर नाईन्टीन क्रिकेट खेळायला सुरवात केली, तेव्हा त्याला ९ नंबर मिळालेला, पण त्याला सिंगल डिजिट नंबर पाहिजे नव्हता. त्याने थेट आपल्या आईला फोन लावला. विचारलं कोणता नंबर घेऊ, तेव्हा आईने सांगितलं ४५. बस रोहित भाऊने तिथून पुढे आईचा शब्द पाळला, आणि ४५ नंबरच्या जर्सीने पुढे काय इतिहास रचला ते तुम्हाला माहीतच आहे.

विराटच्या १८ नंबरचे मात्र जरा भावनिक कारण. विराटला क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न त्याच्या वडिलांनी पाहिले होते. मात्र, त्याला देशासाठी खेळताना ते पाहू शकले नाहीत. १८ डिसेंबर, २००६ ला त्यांचे निधन झाले. त्या दिवसाची आठवण म्हणून विराट १८ नंबरची जर्सी वापरू लागला. सर जडेजाने तर भलतंच डोक लावलं. त्याला हवा होता १२ नंब, पण तेव्हा टीम इंडियात तो नंबर वापरायचा त्याचाच आयडल युवराज सिंग. मग जड्डूने आपल्या ६-१२-१९८८ या जन्मतारखेची फोड केली.. ६+१+२+१+९+८+८= ४४ आणि शेवटी ४+४= ८ असं गणित जुळवत जर्सी नंबर ८ ठरवला. अशा अनेक जणांच्या अनेक कहाण्या. मात्र तूर्तास इतकेच.

लोकांचे वाजतात १२, पण युवीने का निवडलाय जर्सी नंबर १२? | Indian Cricketers Jersey Numbers

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

तब्बल ३४ वर्षे जुन्या प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धूंना तुरुंगवासाची शिक्षा, काय होतं ते प्रकरण?

दुर्दैवी! असा मृत्यू कोणाचाही होऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूंना अपघातात गमवावा लागलाय जीव

काही कळायच्या आत डॅनीने करिष्माला उचलून घेतले, अन् ‘ते’ कांड झाले, जाणून घ्याच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---