आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने आपले वचन पूर्ण केले आहे. त्याने ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीच्या वाढदिवसादिवशी त्याच्यासाठी बनविलेले गाणे ‘हेलिकॉप्टर- ७’ रिलिझ केले आहे. धोनीने आज म्हणजेच ७ जुलै रोजी आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत वयाच्या ४० व्या वर्षात पदार्पण केले आहे.
ब्रावोने धोनीच्या वाढदिवसादिवशी त्याला खास भेट देत हे गाणे रिलिझ केले आहे. धोनीसाठी बनविलेल्या या खास गाण्यामध्ये धोनीच्या रांचीपासून विश्वचषक विजयापर्यंतच्या सर्व प्रवासाचे वर्णन यामध्ये केले आहे. ब्रावोने हे गाणे आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत लिहिले की त्याने दिलेले वचन पूर्ण केले आहे.
धोनीवर बनविण्यात आलेले ब्रावोचे हे गाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस येत असल्याचे दिसत आहे. चाहते कमेंट करत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. हे गाणे रिलिझ करत ब्रावोने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले, “प्रतीक्षा आता संपली आहे. एमएस धोनी तू जगातील अनेक लोकांसाठी प्रेरणा आहात. आम्ही तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयार आहोत.” ब्रावोच्या या गाण्यामध्ये धोनीच्या तिकीट कलेक्टरच्या प्रवासाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
‘हेलिकॉप्टर- ७’ (Helicopter- 7) या गाण्यात ब्रावोने धोनीचा संघर्ष आणि आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफीच्या विजयाबद्दलही सांगितले आहे. याबरोबरच या गाण्यामध्ये धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’चाही उल्लेख केला आहे.
याव्यतिरिक्त सीएसकेने (Chennai Super Kings) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ब्रावोचे गाणे शेअर करत लिहिले, “‘हेलिकॉप्टर- ७’ ने भरारी घेतली आहे. ड्वेन ब्रावोकडून थाला एमएस धोनीसाठी भेट. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एमएस धोनी.”
https://www.instagram.com/p/CCTuKOzHvNr/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएलदरम्यान ब्रावो (Dwayne Bravo) आणि धोनीने (MS Dhoni) अनेक वर्षांपासून सीएसकेचे ड्रेसिंग रूम शेअर केली आहे म्हणजेच एकसोबत खूप वर्ष खेळले आहे. ब्रावोने यापूर्वीही काही गाणे रीलिझ केले आहेत. त्याचे ‘चॅम्पियन’ हे गाणे तर जसे काही २०१६ मध्ये वेस्ट इंडिजच्या टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर एक प्रतिज्ञेप्रमाणे बनले होते तसेच ते खूप प्रसिद्धही झाले होते.
The Helicopter 7 has taken off! @DJBravo47's tribute to #Thala @msdhoni, his brother from another mother! #HappyBirthdayDhoni #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/KAs8gGFIzt
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 6, 2020
ब्रावोने नुकतेच म्हटले होते, की इतर बऱ्याच खेळाडूंप्रमाणे धोनीचाही प्रभाव त्याच्या कारकिर्दीवर पडला आहे. आता त्याला धोनीसाठी काहीतरी करायचे आहे. तो म्हणाला होता, “धोनी आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर आहे. माझ्या कारकिर्दीवरही त्याचा खूप प्रभाव पडला आहे.”
ब्रावोने हर्षा भोगले यांच्याशी क्रिकबझवर चर्चा करताना म्हटले होते, की आता मी धोनीसाठी काहीतरी करायचे आहे. त्यासाठी मी धोनीसाठी हे गाणे अर्पण करत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आनंदाची बातमी: आता टी२० विश्वचषक नाही, तर आयपीएलचे होणार आयोजन
-पत्रास कारण की… केदारचे धोनीला बर्थडे स्पेशल पत्र
-या ५ कारणांमुळे आयपीएल २०२०चे आयोजन होऊ शकते युएईत