बेंगलोर | गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाला पहिल्या अनाधिकृत कसोटी सामन्यात एक डाव आणि ३० धावांनी पराभूत केले.
एम. चिन्नस्वामी मैदानावर झालेल्या या कसोटी सामन्यात भारताच्या मोहम्मद सिराज पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही पाच बळी मिळवत विजयाचा शिल्पकार ठरला.
सिराजने पहिल्या डावात ५६ धावात पाच तर दुसऱ्या डावात ७३ धावात ५ बळी मिळवत अविश्वसनीय कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या होत्या.
तर भारताने पहिल्या डाव सलामीवीर मयांक अगरवालच्या २२० धावा आणि पृथ्वी शॉच्या १३६ धावांच्या जिवावर ८ बाद ५८४ वर घोषित करत, ३३८ धावांची आघाडी मिळवली होती.
सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेला ३०८ धावांवर सर्वबाद करत ३० धावा आणि एका डावाने पराभव केला.
दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात रुडी सेकेंडने सर्वाधिक ९४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक-
दक्षिण आफ्रिका अ पहिला डाव- सर्वबाद २४६
भारत अ पहिला डाव- ८ बाद ५८४ घोषित
दक्षिण आफ्रिका अ दुसरा डाव- सर्वबाद ३०८
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–थोड्याच दिवसात कोहली जगातील महान फलंदाज म्हणून ओळखला जाईल